अक्कलकोटचा भगवंत आप्पा सुतार हा महाराजांचा भक्त होता श्री समर्थ त्याचे घरी दोन दोन दिवस राहत असत श्री समर्थ कृपेने त्याच्या शेतातील विहिरीला पाणी विपुल होते एकदा त्याच्या मनात आले की श्री स्वामी महाराजास शेतात नेऊन भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद म्हणून घ्यावा त्याने श्री स्वामीस विनविले की मळ्यात कृपा करुन चलावे थोडे थांब श्री स्वामींनी उत्तर दिले आप्पा सुताराने चार पाच वेळा विनंती केली त्याचे उत्तर थोडे थांब असेच मिळत होते काशिनाथपंत म्हसवडकरांना सुताराने सूचना केली महाराजांस मळ्यापर्यंत घेऊन चलावे म्हसवडकरांनी श्री स्वामीस विनंती करताच त्यांनी मळ्याचा रस्ता धरला आणि ते सुताराच्या शेतात जाऊन बसले सुताराने आणलेल्या सामग्रीचा काशिनाथपंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक तयार केला महाराजास स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजन करुन त्यांना भोजन घातले म्हसवडकर व सबनीस भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली त्यांना भोजन घालण्याची श्री स्वामींची आज्ञा झाली तिघांचे अन्न (स्वयंपाक) त्यात इतकी मंडळी कशी जेवतील म्हणून म्हसवडकरांना काळजी पडली महाराज म्हणाले कायकू दिलगीर होते है श्री स्वामींची आज्ञा प्रमाण समजून येतील तसतशी मंडळी ते भोजनास बसवित असत म्हसवडकर बाबा सबनीस भगवंत आप्पा सुतार व त्याचा भाऊ असे चौघे शेवटी जेवले चार पानांच्या सामग्रीत पन्नास असामी जेवले अन्नाची उणीव मुळीच पडली नाही.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

भगवंत आप्पा सुतार हा श्री स्वामी समर्थांचा साधा भोळा गरीब भक्त होता त्याच्याजवळ ना पांडित्य ना थक्क करणारी विद्वत्ता श्री समर्थ कृपेनेच त्याने त्याच्या शेतात खोदलेल्या विहिरीस भरपूर पाणीही लागले होते त्यामुळे त्याची शेतीही बरी पिकत होती तो व त्याचे कुटुंबिय खाऊन पिऊन सुखी होते हे सर्व केवळ श्री स्वामी समर्थ कृपेनेच चालले आहे अशी त्याची मनोमन कृतज्ञ भावना होती उपासनेत अथवा भक्तीमध्ये देवाबद्दलच्या कृतज्ञतेला महत्त्वाचे स्थान आहे म्हणूनच कृतज्ञतेविना भक्ती कोरडी असे म्हणतात श्री स्वामींनी केलेल्या या उपकारातून थोडे तरी उतराई व्हावे म्हणून त्यांना मळ्यात बोलावावे जेऊ खाऊ घालावे त्यांचे उच्छिष्ट अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे आणि धन्य धन्य व्हावे अशी त्याची साधी भोळी सरळ कल्पना होती म्हणून त्याने श्री स्वामींना विनम्रभावे विनविले महाराज कृपा करुन मळ्यात चलावे सर्वसाक्षी श्री स्वामींनी त्याच्या मनातला भक्तिभाव जाणला होता पण ते लगेच निघाले नाहीत थोडे थांब असे त्यांनी त्यास उत्तर दिले भगवंत आप्पा सुताराने चार पाच वेळा त्यांना विनंती करुनही त्यांचे तेच उत्तर थोडे थांब काशिनाथपंत व बाबा सबनीसांकडून श्री स्वामींनी स्वयंपाक करुन घेतला त्या दोघांनीही तो सोवळ्यात केला श्री स्वामींना सोवळे ओवळे याचा अतिरेक मान्य नव्हता पण निर्मळपणा शुद्धता पावित्र्य याचे ते आग्रही होते शारीरिक मानसिक आणि वाचिक शुद्धता असलीच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता त्यामुळेच त्यांनी अक्कलकोटातील काशिनाथपंत आणि बाबा सबनीसां सारख्या सच्छिल प्रेमळ सत्त्वशीलाकडून स्वयंपाक करुन घेतला भगवंतआप्पा सुतार हा गरीब होता त्याने चार माणसांची शिधासामग्री त्या दोघांस दिली त्या सामग्रीतच त्यांनी नैवेद्य केला गरीब सुताराने तो मनोभावे श्री स्वामी समर्थांस अर्पण केला श्री स्वामीही जेवून संतोष पावले पण त्यांनी नंतर येत गेलेल्या सेवेकर्यांसही जेवू घालण्याची आज्ञा केली काशिनाथपंत म्हसवडकर तर घाबरलेच चार जणांचीच भोजन व्यवस्था असताना जास्तीचे काय करणार श्री स्वामी आज्ञा जस जसे सेवेकरी येत गेले तसतसे त्यांना भोजनास बसविण्यात आले चार माणसांच्या भोजन व्यवस्थेत पन्नास माणसे जेवली केवढे आश्चर्य पण याचा मथितार्थ पाहिला तर यात आश्चर्य वाटणार नाही कारण श्री स्वामी म्हणजे जगन्नाथ पूर्ण ब्रह्यस्वरुप ते म्हणाले कायकू दिलगीर होते है मी येथे असताना काळजी कशाला निर्भय व्हा निःशंक राहा अशक्यही शक्य करतील स्वामी याचा प्रत्यय त्या दिवशी सर्वांनाच आला सद्याच्या धावपळीच्या काळ काम वेग याच्याशीच निगडित असलेल्या जीवनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण जप करण्यास १०-१५ मिनिटेही मिळणार नाहीत का आपणास सर्व काही देणाऱ्या आपल्यावर कृपा करणाऱ्या श्री स्वामीसाठी आपण थोडसेही थांबणार नसू त्यांचे चिंतन स्मरण करीत नसू तर कोणता आशय अर्थ भावार्थ आणि मथितार्थ आपल्या जीवनास आहे याचा विचार ज्या त्या व्यक्तीने करावयाचा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या