श्री स्वामीसुत प्रेमळ अंतःकरणाने श्री स्वामी समर्थांविषयीचे भजन करु लागले की ते ऐकण्यास शेकडो लोक जमत असेच एक दिवस श्री स्वामी सुतांचे मुरलीधराचे देवळात भजन चालले होते भजन ऐकण्यासाठी पुष्कळ मंडळी देवळात जमा झाली होती तेव्हा पूर्वेकडील धर्मशाळेच्या तीन खणांची भिंत अगदी तोलली गेली होती भजन आटोपून मंडळी बाहेर पडत आहे तोच धर्मशाळा एकदम पडली अशाप्रकारची लीला करुन श्री स्वामींनी स्वामीसुताच्या भजनात विघ्न येऊ दिले नाही.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

एकदा श्री स्वामीसुत अक्कलकोटास आले तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात असल्यामुळे श्री स्वामींचे कुणासही दर्शन होत नसे तेव्हा श्री स्वामीसुतांनी राजवाड्यापुढे जो साष्टांग नमस्कार जमिनीवर घातला तो ते तीन दिवसपर्यंत उठले नाही मग जेवणखाण वगैरे कसले स्वामीसुतांनी त्या प्रसंगी म्हटलेला अभंग पुढीलप्रमाणे आहे-
माझी माता तुमचे घरी!म्हणूनि मी हो आलो द्वारी!!आम्हा नको तुमचे काही!स्वामीचरण दावा बाई!!स्वामीचरणांचे रज!देऊन तृप्त करा मज!!माझी माय आहे आंत!मज दाखवा त्वरित!!माय सोडूनिया बाळ!कैसा घालविल काळ!!आम्ही जाऊनिया आंत!तुमचे काही नाही नेत!!प्रेमपान्हा देऊनि सोडा!गात येऊ हो पोवाडा!!स्वामीसुत म्हणे आई!बाळा भेटवावे बाई!!

अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थांना स्वामीसुताच्या या भावना कळल्या चौथे दिवशी श्री स्वामी कळवळून धावत राजवाड्याबाहेर आले त्यांनी स्वामीसुतास उठवून राजवाड्यात नेले त्या दिवसापासून स्वामीसुतास राजवाड्यात जाण्याची परवानगी मिळाली वास्तविक अन्य कुणाही पुरुषास राजवाड्यात जाण्याची परवानगी नव्हती पण स्वामीकृपा असे जेथे!काय उणे तेथे!!मुरलीधराच्या देऊळात स्वामीसुत श्री स्वामींविषयी भजनात दंग झाले होते एक बाका प्रसंग श्री स्वामी कृपेमुळेच टळला नव्हे श्री स्वामींनीच स्वामी सुताच्या भजनात व्यत्यय येऊन कोणतीही प्राणहानी होऊ नये म्हणूनच केलेली ही लीला पितृस्थानी असलेल्या सदगुरु श्री स्वामींची अखंडकृपा हरिभाऊंवर होती हे स्पष्ट करणारी आहे त्यांनी तू माझा सूत हो म्हणून त्यास निःसंदिग्धपणे सांगितले होते त्यांनीसुद्धा एकनिष्ठ शिष्याची आणि आज्ञाधारक मुलाची भूमिका सदैव पार पाडली श्री स्वामी चरित्रात ती अजरामर ठरली.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या