श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास येण्यपूर्वी हुमनाबादेस माणिक प्रभूस भेटण्यास गेले त्यावेळेसही त्यांच्या बरोबर दोन दुसऱ्या मूर्ती होत्या अक्कलकोटचे बाबा सबनीस नित्याप्रमाणे माणिक प्रभूंच्या दर्शनास गेले असता त्यांनी दोन मूर्तींसह श्री स्वामी समर्थ तेथे बसलेले पाहिले माणिक प्रभूंनी महाराजांचे दर्शन घेण्याकरता बाबा सबनीसास स्पष्ट सांगितले की "अतःपर हे स्वामी महाराज तुझे गुरु आहेत त्यांचे दर्शन घे मग बाबाने महाराजांचे व त्यांच्या समवेत आलेल्या दोन मूर्तींचे दर्शन घेतले महाराजांनी बाबास पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील पुष्कळ गोष्टींची ओळख देऊन तू कसाई आहेस असे ते म्हणाले अक्कलकोटकू जाव हम भी आवेगे असे बाबांनी ऐकून आपण अक्कलकोटचे राहणारे हे महाराजांस कसे कळले त्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले आपली आई फार आजारी असताना जाऊ नको म्हणून ती वारंवार सांगत असताना आपण निर्दयीपणे तिला सोडून आलो म्हणून आपल्याला कसाई म्हणून श्री स्वामींनी हाक मारली श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बाबा सबनीसांची खात्री झाली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

प्रपंच करताकरता खरे सुख प्रपंचाबाहेर असते हे ज्यास उमजते त्यास जिज्ञासू म्हणतात असे जिज्ञासू परमार्थाच्या निखळ आनंदासाठी आणि लाभासाठी भटकत असतात अशाच प्रकारचे जिज्ञासू बाबा सबनीस होते असे हे बाबा सबनीस हुमनाबादच्या माणिकप्रभूंच्या दर्शनास गेले होते तेथे त्यांनी अन्य दोन यतीसमवेत श्री स्वामी समर्थांना बसलेले पाहिले अर्थात त्यावेळी त्यांना महाराज स्वामी समर्थ असे काहीच नाव नव्हते त्यामुळे बाबास श्री स्वामी महाराजांची ओळख पटणे आणि थोरवी कळणे शक्यच नव्हते श्री माणिक प्रभूंनी स्वतः उठून श्री स्वामी समर्थांचे मनःपूर्वक आगत स्वागत केले त्यांच्या थोरवीचे वर्णन केले त्यांनी बाबास महाराजांचे दर्शन घेण्यास सांगितले व स्पष्टपणे म्हटले की "अतःपर हे स्वामी महाराज तुझे गुरु आहेत दोन वर्षांनी हे अक्कलकोटला येतील महाराजांनी अंतःसाक्षित्वाने बाबा सबनीसांविषयी सर्वच जाणले होते म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांनी बाबांची चांगलीच झाडा झडती घेऊन त्यास शिव्या दिल्या बाबांच्या मनातील पुष्कळ गोष्टींची ओळख करुन दिली तू कसाई आहेस असे म्हणून बाबांवर चांगलेच रागावले आपणास कसाई म्हणून श्री स्वामींनी फटकारले यावर बाबा आत्मशोध आत्मचिंतन करता करता त्यांना आठवले व त्यांनी मनोमन कबुल केले की होय खरोखर आपण निर्दयी कसाईच आहोत आपली आई फार आजारी असताना ती जाऊ नकोस म्हणून वारंवार विनवणी करीत असतानाही तिला एकटीला निर्दयीपणे सोडून आपण येथे हुमनाबादला आलो खरोखर आपण कसाईच आहोत श्री स्वामींनी हे सर्व जाणूनच आपल्याला कसाई म्हटले श्री स्वामी महाराज अवतारी आहेत याची बाबा सबनीसाला तेथल्या तेथे खात्री पटली माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी देवता स्वरुप असलेल्या आपल्या आईला सोडून आपण आलो ते ही ती खूप आजारी असताना मला सोडून जाऊ नकोस असे म्हणत असताना बाबा त्यांच्या या अपराधाने अतिशय खंतावले श्री स्वामींनी म्हटल्याप्रमाणे आपण खरोखर एक प्रकारे कसाईच आहोत याचा बाबाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला खरा परमार्थ ईश्वर सेवा याचा मथितार्थ त्यास या प्रसंगाने बाबास समजला आई वडिलांची सेवा देखभाल न करता सत्पुरुषांच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांना यातून निश्चितच बोध घेता येईल.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या