एकदा श्री स्वामी समर्थ राजाच्या अंगणात फिरत असता त्यांनी हुजर्याच्या हातातील सुवर्णाचा चौफुला हिसकावून घेतला अंगणात असलेल्या विहिरीकडे पाहून श्री स्वामींनी राजास प्रश्न केला हा चौफुला विहिरीत टाकू त्यावर राजाने श्री स्वामीस हात जोडून प्रार्थना केली महाराज चौफुला आपलाच आहे त्याचे पाहिजे ते करावे हे ऐकून श्री स्वामींनी चौफुला विहिरीत फेकून दिला सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्वांस वाईट वाटले परंतु राजास श्री स्वामींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती रात्री महाराज राजवाड्यातच राहिले दुसरे दिवशी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले राजाही तेथे आला अरे पोहरा आण म्हणून श्री स्वामींनी राजास आज्ञा केली राजाने तत्काळ पोहरा व दोर आणविला विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो पोहर्यातून सुवर्णाचा चौफुला वर आला चौफुल्यातील लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुके असल्याचे दृष्टीस पडले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या अवतार काळात अनेकांची श्रद्धा निष्ठा जोखल्याच्या पाहिल्याच्या लीला आहेत त्यापैकीच ही एक आहे श्रद्धा आणि निष्ठा यातला फरक त्यातला आशय आणि सामर्थ्य माहीत असावे लागते तेच श्री स्वामींना या लीलेतून तुम्हा आम्हास बोधित करावयाचे आहे श्रद्धा म्हणजे विश्वास भरोसा प्रसंगी तो डळमळतोही पण कितीही कसोटीचा क्षण अथवा प्रसंग आला तरी निष्ठा डळमळत नाही ती अविचल राहते येथे श्री स्वामींनी लवंगा वेलचीसह असलेला सोन्याचा चौफुला विहिरीत टाकू का म्हणून राजास विचारले पण राजाची श्री स्वामींवर निव्वळ श्रद्धाच नव्हे तर अव्यभिचारी अचल अढळ निष्ठा होती क्षणाचाही उशीर न लावता राजाने हात जोडून श्री स्वामींस महाराज चौफुला आपलाच आहे त्याचे पाहिजे ते करा दिलेले उत्तर अतिशय मननीय चिंतनीय आणि अनुकरणीय आहे श्री स्वामी समर्थांच्या रुपाने चालता बोलता देहधारी सगुण भगवंतच आपल्या राज्यात आपल्या गावात आपल्या राजवाड्यात अवतरला आहे तर त्यांच्या कृपा लाभासाठी क्षुद्र सोन्याचा चौफुलाच काय पण असली छपन्न राज्ये ओवाळून टाकण्याची राजाची तयारी होती म्हणूनच त्या सुवर्ण चौफुल्याची काही एक मातब्बरी न मानता राजाने निर्विकारपणे त्या सोन्याच्या चौफुल्याचे आपल्या इच्छेप्रमाणे हवे ते करावे असे श्री स्वामींस प्रार्थनापूर्वक विनविले आता येथे तो सुवर्णाचा चौफुला म्हणजे काय ती कसली विहिर चौफुल्यातील लवंगा व वेलची म्हणजे काय त्या रात्री श्री स्वामींनी राजवाड्यात मुक्काम का केला त्याचा अर्थ काय या सर्व बाबींचा भावार्थ मथितार्थाचा वेध घेणे उदबोधक ठरणार आहे सोन्याचा चौफुला म्हणजे आपला मौल्यवान मानवी देह मन चित्त बुद्धी आणि अहंकार हा चौफुला त्यात विवेक आणि सदवासना (चांगल्या इच्छा) म्हणजे लवंगा व वेलची सारखे पदार्थ विहिर म्हणजे माणसाचा संकुचित स्वार्थी प्रपंच होय असा हा लवंगा व वेलचींनी भरलेला सुवर्ण चौफुला प्रपंचाच्या विहिरीत जरी पडला वा टाकला तर अव्यभिचारी अचल अढळ निष्ठेच्या बळावर आणि सदगुरु परब्रह्य श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने तो जसाच्या तसा सुरक्षित कोरडा राहू शकतो तो मौल्यवान चौफुला (मानवी देह चित्त बुद्धी आणि अहंकार) लवंगा व वेलची (विवेक सदवासना) केवळ परमेश्वरी कृपेमुळेच शाबूत राहिले श्रेद्धेचे दृढत्व निष्ठेचा पक्केपणा उपासनेतील निर्मोहीपणा निश्चितच श्री स्वामी समर्थ कृपा मिळवून देते हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या