कारभारी नानासाहेब बर्वे यास श्री स्वामींच्या पाठिंब्यामुळे धैर्य आले दुसरे दिवशी बर्व्यांनी फौजदारास हुकूम दिला की बाईस महाराजांपासून दूर करावे फौजदार व हुकूम घेऊन तेव्हा ओंडकरांच्या वाड्यात असलेल्या महाराजांकडे गेले त्यांचे दर्शन घेऊन बाईस म्हणाले आजपावेतो मातोश्रीप्रमाणे आम्ही तुम्हाला मानले आता सरकारचा हुकूम मी बजावित आहे तेथे माझा उपाय नाही आपण महाराजांजवळ बसू नये चालते व्हावे लोकांसारखे दर्शन घेत जावे यापुढे महाराजांजवळ राहण्याची सरकारची तुम्हाला परवानगी नाही सुंदराबाईस हे ऐकून थट्टा वाटली आणि ती हसू लागली पण फौजदाराने सांगितले की ऊठा ऊठा लवकर हे ऐकून बाईस हा हुकूम असल्याचे जाणवले मग ती फौजदाराची व महाराजांची प्रार्थना करु लागली तरीही फौजदार काही ऐकेना मग ती श्री स्वामींस म्हणाली तुम्ही तरी फौजदारास काही सांगा महाराज काही एक बोलले नाहीत.
अर्थ भावार्थ मथितार्थ
वरील लीलाभागात आसक्ती स्वरुप देहबुद्धी असलेल्या सुंदराबाईवर ही अशी वेळ का आली हे आपण लक्षात घेतले पाहिजे तिच्या या स्थितीस ती स्वतःच जबाबदार आहे ज्या श्री स्वामी समर्थ दरबारात एकेकाळी ती फुले वेचत होती तिथेच तिला दीनवाणे पणाने शेणाच्या गोवर्या वेचण्याची वेळ आली यातून आपण काय बोध घ्यावयाचा हे विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही हुकूम बजवावयास गेलेल्या फौजदाराने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन बाईस सांगितले आजपावेतो मातोश्रीप्रमाणे आम्ही तुम्हाला मानले आता सरकारचा हुकूम मी बजावित आहे तेथे माझा उपाय नाही आपण महाराजांजवळ बसू नये चालते व्हावे लोकांसारखे दर्शन घेत जावे यापुढे महाराजांजवळ राहण्याची सरकारची तुम्हाला परवानगी नाही हे सौम्य स्वरुपात तिला सांगितले ते केवळ महाराजांमुळेच पण फौजदाराचे हे भाष्य तिला सुरुवातीस थट्टाच वाटली सुंदराबाईच ती आपण महाराजांच्या सान्निध्यात आहोत सेवेत आहोत याची तिला घमेंड होती आजपर्यंत तिच्या अपकृत्यांची वा दुष्कृत्यांचा घडा भरेपर्यंत सर्व काही समजत असूनही अधिकारी कारभारी व अन्य नोकर चाकर सेवेकरी सुंदराबाईशी समजूतदारपणे वागत होते सदगुरुरुपी विवेक हा स्वार्थी लोभी देहबुद्धीला विशिष्ट मर्यादेपर्यंत आवर घालण्याचा प्रयत्न करतो होत असणाऱ्या अधःपतनाची त्या जीवास जाणिवही करुन देत असतो परंतु अखेरीस कुणाही व्यक्तीचे प्रारब्ध कर्मच सर्व गोष्टीस कारणीभूत असते शेवटी काय तर मना त्वांचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले तिच्या कर्मभागाची अनिवार्यताच तिच्या या अवस्थेला कारणीभूत ठरली जसे कर्म तसे फळ ऊठा ऊठा लवकर अशा पोलिसी फौजदारी खाक्यात तिला बोलताच ती ताळ्यावर आली तो हुकूम आहे अशी तिची आता खात्री झाली मोह मायात बुडालेली देहबुद्धी रुपी ती फौजदार आणि महाराजांची आर्जव करु लागली फौजदार जेव्हा तिचे ऐकेना तेव्हा ती विवेकरुपी सदगुरु महाराजास विनवू लागली तुम्ही तरी फौजदारास काही सांगा म्हणजे ती विवेकास वाचविण्यासाठी प्रार्थना करीत होती परंतु विवेकरुपी सदगुरुस तिच्या आसक्तीरुपी देहबुद्धीचा आता कडेलोट झाला आहे याची जाणीव झाली होती ती सुधारण्याच्या फार म्हणजे फार पलीकडे गेली होती हे स्पष्टच दिसत होते म्हणून विवेक रुपी सदगुरुंनी हस्तक्षेप केला नाही या अगोदर अनेकदा तिला सुधारण्याची संधी देऊन झाली होती पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण सद्यःस्थितीत काल मान प्रसंगपरत्वे षडरिपू विरहित जगण्याचा जीवनक्रम घालविण्याचा प्रयत्न करणे हाच इथला महत्त्वाचा अर्थबोध आहे देहबुद्धीतला आसक्तीचा अतारिक्त लोभाचा प्रयत्नपूर्वक निचरा करुन सदसदविवेकाने जगण्याचा प्रयत्न करावा हाच यातील मथितार्थ आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्
योग साधना विशेष संबंधित पोस्टस्
आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्
देवी उपासना संबंधित पोस्टस्
पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्
त्राटक विद्या संबंधित पोस्टस्
वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्
अंकशास्त्र संबंधित पोस्टस्
पितृदोष संबंधित पोस्टस्
दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम
All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !
Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या