श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय भोजन करायचे नाही असा मोहोळच्या शिल्पकाराचा दररोजचा नियम होता असा त्याचा क्रम चार महिने चालला एके दिवशी तो श्री स्वामींच्या दर्शनास जात असता त्याच्या मनात विचार आला आमचे कुलदैवत श्री मल्हारीमार्तंड म्हाळसाकांत कैलासपती शिवाचे दर्शन व्हावे तो श्री स्वामींपुढे त्यांचे दर्शन घेऊन उभा राहिला तो श्री स्वामी महाराजांनी अंतःसाक्षित्वाने त्याचा हेतू जाणून ते म्हणाले अरे तुझ्या मनात आहे ते आता प्रत्यक्ष पाहा थोड्याच वेळात जटाभस्मांकित शिव स्वरूप त्यास दर्शन दिसू लागले तो देहभान विसरून श्री स्वामीस साष्टांग नमस्कार घालून म्हणाला हे शिव भगवान आज माझ्या बेचाळीस कुळांचा उध्दार झाला गंगाधरा हे पिनाकपाणी हे शिवमल्हारी हे सदगुरु स्वामी आता माझा अनाथाचा उध्दार करा विनम्रभावाने हात जोडून उभ्या राहिलेल्या त्या शिल्पकारास श्री स्वामी महाराज म्हणाले जा आता आमचे भजन पूजन कर सर्वांभूती भगवदभाव ठेव म्हणजे तुझा उध्दार होईल 


अर्थ / भावार्थ / मथितार्थ

या लीलाकथेतील शिल्पकार साधा भोळा सरळमार्गी जीव आहे श्री स्वामी समर्थांठायी त्याचा दृढ भावही आहे असे श्री स्वामी उपासकाने असणे अपेक्षित आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती करतांना त्या भोळ्या भाबड्या शिल्पकाराचा अहंकार भक्तीत विसरून गेला होता म्हणून तर परमेश्वर स्वरूप श्री स्वामींनी त्याची शिवमल्हार दर्शनाची मनोकामना पूर्ण केली अशीच साधी भोळी सरळ स्वामीभक्ती करण्याचा बोध या लीलेतून मिळतो त्यामुळेच तर शबरी भिल्लिणीला रामाचे मीरेला श्रीकृष्णचे तर पुंडलिकाला पांडुरंगाचे दर्शन झाले  अशी अनेक उदाहरणे देता येतील जन्मभर कथा कीर्तने प्रवचने करणाऱ्या भाबड्या व्यक्तीस वारकर्यास हे दर्शन सहज घडून येते मी श्री स्वामी समर्थांचा आणि श्री स्वामी समर्थ माझे सुख दुःखतही हीच भावना असणे महत्त्वाचे त्याचबरोबर आपल्या मनातील गोष्टी साकार करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी शिल्पकारास या लीलाकथेत केलेला उपदेशही आपण सर्वांनी अनुकरण करावा असाच हाही बोध येथे मिळतो

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या