परशुराम सेवेकर्याने काशीयात्रेसाठी श्री स्वामी समर्थांना विचारले तेव्हा श्री स्वामी म्हणाले संत चरणांची माती! तीच माझी भागिरथी हे स्वामीवचन ऐकून परशुराम सेवेकर्याने काशीस जाण्याचा बेत रहित केला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

परशुराम सेवेकर्यास श्री स्वामींचे श्रेष्ठत्व गुरुत्व माहित नव्हते नसावे कारण तो एक साधा सरळ उपासक होता परंतु श्री स्वामींना गुरुतीतेतील वचनानुसार त्यास सुचवावयाचे होते की

"काशीक्षेत्रं तन्निवासो जान्हवी चरणोदकम् !
गुरुर्विश्वेश्वरा साक्षात् तारकं निश्चितम् !! (गुरुगीता ९) 

अर्थ - 

जेथे गुरू राहतात तेच काशीक्षेत्र त्यांच्या चरणाचे तीर्थ हीच गंगा आणि गुरू हेच साक्षात काशीविश्वेश्वर असून तेच निश्चयात्मक तारक ब्रम्ह होय यातून असाच अर्थबोध होतो की प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य वावर जेथे आहे तेच काशी क्षेत्र आणि श्री स्वामी हेच काशीविश्वेश्वर परंतु तीर्थयात्रा करीत फिरणार्यांच्या अनेकदा ते लक्षात येत नाही अर्थात श्री स्वामी समर्थांसारखा गुरू मिळणे सद्यःस्थितीत कठीणच तीर्थयात्रा करीत फिरण्यापेक्षा मनोभावे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा अन्य उपासना करीत नेटका प्रपंच करणेच उत्तम आणि श्रेयस्कर मग त्यांच्यासारखा गुरू आपण ह्रदयीच्या देव्हार्यात स्थापल्यावर इतरत्र शोधाशोध करण्यात काय अर्थ सद्यःस्थितीतही सदगुरु श्री स्वामी समर्थ मै गया नही जिंदा हूँ याची प्रचिती निर्गुण निराकार स्वरुपात वावरुन करुन देतात त्यांच्या या वचनातून गुरुमाहात्म्य आणि अस्तित्व अधोरेखित होते हे परशुराम सेवेकर्यास नंतर जाणवल्याने त्याने जाण्याचा बेत रद्द केला .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या