असेच दुसऱ्या एका बाईच्या मानेला एक उठाणू होऊन ते फुटले ते काही केल्या बरे होईना पुष्कळ औषधे केली पण गुण येईना एके दिवशी ती श्री स्वामी समर्थांचे दर्शनास आली दर्शन घेऊन ती त्यांना म्हणाली महाराज या मानेला तुम्ही तरी काही औषध सांगा तेव्हा महाराज म्हणाले त्याला बैलाचे मूत लाव म्हणजे बरे होईल तिने तीन चार दिवस बैलाचे मूत लावताच मान चांगली बरी झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील बाई मानेवर झालेल्या उठाणू म्हणजे गळूच्या दुखण्याने त्रस्त झालेली आहे आताच्या सारखी सुधारित औषधोपचार पद्धती तेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा तिच्या दृष्टीने एकमेव धन्वंतरी असलेल्या श्री स्वामी समर्थांकडे ती गेली त्यांनी सांगितलेल्या बैलाचे मूत लावण्याचा उपचार निश्चितच मुलखा वेगळा वाटतो पण तो श्री स्वामींसारख्या सर्वसाक्षी दैवी विभूतीने सांगितलेला उपचार आहे गुण येणारच या श्रद्धेने तिने तो उपचार केला चार दिवसात ती बरी झाली पण या कथेचा भावार्थ जरा खोलात जाऊन पाहू या ती स्त्री तुमच्या आमच्या सारखी जन्म मरणाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी आहे संचित कर्माचे प्रारब्धाचे गळू तिला त्रस्त करुन सोडत आहे यावर तेव्हा एकमात्र उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थांस शरण जाणे हाच होता त्यावर उपाय बैलाचे मूत्र मूत्र शिवांबू याबाबतचे विवेचन या अगोदर आले आहेच या कथेतला औषधोपचार चार दिवसांचा आहे म्हणजे या अगोदर सांगितलेल्या तीन टप्प्यांव्यतिरिक्त जास्तीचा एक टप्पा प्राणायामाचा आहे प्राणायामाने शरीरातील प्राणशक्तीची सहा केंद्रे कार्यान्वित होऊन प्राणशक्तीला चालना मिळाली की शरीराची शुद्धी होते या शुद्धीकरणाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत 

  • १)मूलाधाराच्या शुद्धीने मोक्षाकडे ओढा निर्माण होतो प्रपंचातील आकर्षण कमी होते 
  • २)स्वाधिष्ठान चक्राच्या शुद्धीने षडरिपूंचा नाश होतो 
  • ३)मनिपुराच्या शुद्धीने आत्मसाक्षात्काराकडे झपाट्याने वाटचाल होते 
  • ४)ह्यदयस्थानी असलेल्या अनाहत चक्राच्या शुद्धीने लोकेषणा वित्तेषणा पुत्रेषणा या तीन त्रयींचा नाश होतो 


(लोकषणा प्रसिद्धी मानसन्मानाची जबरदस्त इच्छा वित्तेषणा स्थावर जंगम संपत्ती वाढविण्याची हाव पुत्रेषणा मुलंबाळं या विषयीची ममत्वाची भावना) या तीन त्रयीच्या हव्यासाने माणूस मी माझे माझा प्रपंच या पलीकडे पाहू शकत नाही तो आत्मकेंद्रित आणि संकुचित वृत्तीचा व कृतीचा बनतो ५)कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्राच्या शुद्धीने माया मोह ममतेचा नाश होतो ६)भूयोर्मध्यात असलेल्या आज्ञाचक्राच्या शुद्धीकरणाने सदगुरुची भेट होऊन आत्मदर्शन होते त्यातूनच आत्मसाक्षात्कारीची वाट मोकळी होते या कथेतील बाईच्या मानेवरचे गळू श्री स्वामींनी सांगितलेल्या उपायांनी चार दिवसात बरे झाले ही झाली व्यवहारातील बाजू परंतु अध्यात्माच्या दृष्टीने उपासनेत घाईगडबड करुन चालत नाही प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाने वर सांगितलेल्या सहा गोष्टी साध्य केल्यावर मिळवायचे काय बाकी राहते प्राणायाम ध्यान धारणा जप नामस्मरण आदी उपासना अधिकारी पात्र व्यक्तींकडून मार्गदर्शक गुरुकडून समजावून घ्याव्यात आहार विहार व्यवहार आणि मैथून या मानवी जीवनातील क्रिया सदसद विवेकाने आणि संयमित मनाने आणि बुध्दीने कराव्यात श्री स्वामींच्या वेळचा काळ सामाजिक स्थिती आणि सध्याची २१ व्या शतकातली स्थिती माहिती तंत्रज्ञान याचा वापर काळ मेळ जुळवून जीवन जगावे यासाठी एक डोळा डोळस आध्यात्माचा तर दुसरा डोळा वास्तववादी मूल्याधिष्ठीत विज्ञानाचा असावा म्हणून या लीलेतील अ आणि ब भागाचा अभ्यासूपणे विचार करुन त्यातून अर्थबोध घ्यावा.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या