मुंबईचे त्यावेळचे सर्वपरिचित सावकार भाऊ रसूल (भाऊ रसेल अजिंक्य) एकदा अक्कलकोटला आले श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करुन आणि ब्राम्हण भोजन घालून त्यांनी श्री स्वामींस प्रार्थना केली की महाराज माझ्या व्यापाराची भरभराट झाली तर दोनशे रुपये श्रींपुढे आणून ठेवीन असा नवस करुन ते मुंबईला परत आले पुढे श्री स्वामी समर्थकृपेने त्यांची भरभराट होऊन त्यांना पुष्कळ पैसाही मिळाला पुत्रसंतानही झाले मात्र श्री स्वामींना नवस केल्याची आठवण त्यांना राहिली नाही ती आठवण करुन देण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी तीन वर्षाचे बालरुप धारण करुन ते मुंबईस भाऊ रसूलांच्या घरात रांगू लागले भाऊ रसूल भोजनास बसले रांगणार्या त्या बालकास पाहून ते म्हणाले हे कोणाचे लेकरु इतक्यात बालरुप सोडून स्वामींनी यतिरुप धारण केले आणि अरे मादरचोद आमचे दोनशे रुपये देतोस की नाही असे म्हणून ते एकाएकी गुप्त झाले नंतर सावकार भाऊ रसूल अक्कलकोटी आले श्री स्वामींची झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागू लागले महाराज मी मदांध होऊन नवसाची आठवण विसरलो असे असूनही आपण दर्शन देऊन मला पुनीत केले असे म्हणून श्री स्वामींपुढे दोनशे रुपये ठेवले श्री स्वामी सावकारास म्हणाले काय रे भोजन करा असे सुध्दा म्हणाला नाहीस (मुंबईस श्री स्वामी समर्थ त्याचे घरी प्रगट झाले तेव्हा ) म्हणजे अतिथी अभ्यागतास एक घाससुध्दा तुझ्या घरी मिळणार नाही असे वाटते त्यावर सावकार भाऊ रसूल म्हणाले महाराज आजपासून आलेल्या अतिथीस अन्नपाणी देत जाईन .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

या लीलेत वार्णिलेल्या भाऊ रसूल सावकारासारखे अनेक प्रापंचिक लोक पूर्वीही होते आताही आहेत संकटमुक्त होण्यासाठी व्यापार उद्योगात भरभराट होण्यासाठी पुत्रसंतान प्राप्तीसाठी देवाला साकडे घालतात अमुक देईन तमुक करीन असे नवस करतात बोलतात देव नवसाला पावला म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो अशा वृत्तीने वागू लागतात उर्जित अवस्था प्राप्त करुन देणाऱ्या देवाचाच त्यांना विसर पडतो अर्थात यात स्वकर्तृत्व सुबुध्दी नियोजन याचाही भाग असतो नाही असे नाही पण परमेश्वराची कृपा आणि अधिष्ठान विसरता येणार नाही हे महत्त्वाचे असते देवास बोललेला नवस विसरु नये त्यास दिलेले वचन मोडू नये असा संकेत आहे म्हणून भाऊ रसूल हे वाया गेलेले कृतघ्नासारखे वागणारे नव्हते हेही या लीलेतून दिसते म्हणूनच त्यांनी लगोलग अक्कलकोटला येऊन नवस फेडला त्याच वेळी श्री स्वामींनी त्यास भारतीय संस्कृती परंपरा अतिथीच्या बाबतीत कशी असते याची जाणीव करुन दिली अतिथी देवो भव हा बोधही येथे आपणा सर्वांस दिसतो .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या