एक तेलंगी ब्राम्हण द्रव्येच्छेने तीर्थयात्रा करीत करीत अक्कलकोटी आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन तो उभा राहिला तेवढ्यात श्री स्वामी महाराज म्हणाले अरे ब्राम्हणा काय इच्छा धरुन आलास तो म्हणाला महाराज दारिद्रयाने गांजलो कर्ज झाले तरी श्री स्वामींनी कृपा करुन मला कर्जमुक्त करावे श्री स्वामी समर्थ म्हणाले आम्ही संन्यासी आमचेजवळ द्रव्य नाही पाहिजे असल्यास यातील माती ने तो म्हणाला माती नेऊन काय करु त्यावर श्री स्वामी म्हणाले नको असल्यास चालता हो हे श्री स्वामी वचन ऐकून तो मनातल्या मनात म्हणाला महाराज सांगतात म्हणून एवढे एक ढेकूळ घेऊ पार्थिव करण्यास तरी त्याचा उपयोग होईल त्याने एक ढेकूळ घेतले व श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून तो घरी जाण्यास निघाला थोडे अंतर चालून गेल्यानंतर ढेकळाचे गाठोडे त्यास जड लागू लागले उत्सुकतेने त्याने गाठोडे सोडून पाहिल्यावर त्यास त्या ढेकळाची पांढरीशुभ्र चांदी झालेली दिसू लागली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

प्रपंच संसार यात अडकलेला हा तेलंगी ब्राम्हण आहे द्रव्येच्छेनेच तो तीर्थयात्रा करीत होता द्रव्येच्छेच्या अतीव लालसेमुळे त्याला तीर्थयात्रा करुनही कोणते पुण्य मिळाले असेल फिरत फिरत अक्कलकोटी आल्यावर श्री स्वामींनी त्यास काय पाहिजे म्हणून विचारल्यावर त्याने कर्जमुक्त होण्यासाठी द्रव्याची मागणी केली द्रव्यलालसेत आकंठ बुडालेला दुसरे काय मागणार पैसा हाच ज्यांचा परमेश्वर आहे त्यांना प्रत्यक्ष सदेह दिसत असलेल्या परमेश्वराचे आकलन कसे होणार परंतु श्री स्वामी महाराजांनी सूचकपणे त्यास सांगितले आम्ही संन्यासी आमचेजवळ द्रव्य नाही पाहिजे असल्यास ही माती ने परंतु पैशासाठीच वेडापिसा झालेला तो तेलंगी ब्राम्हण म्हणाला माती घेऊन काय करु वास्तविक त्याने श्री स्वामींकडे सदैव त्यांची चरणसेवा आणि परमार्थातील ज्ञान मागितले असते तर श्री स्वामींनी ते ज्ञान तर दिलेच असते पण त्याचे कर्जही अगदी सहज फेडण्याची व्यवस्था करुन त्याचा प्रपंच सुखा समाधानाचा आणि आनंदाचा केला असता पण हवी तर इथली माती घेऊन जा हे सांगण्यामागे त्यांचा व्यापक हेतू आहे पैसा अडका धन संपदा अंतिमतः मातीमोल होत असते परंतु तीर्थयात्रा करुन आलेल्या त्या ब्राम्हणास तेही लक्षात आले नाही देवाचे बोलणे कळण्यास आचार विचार आणि चित्ताची शुद्धी असावी लागते त्याचे मन द्रव्येच्छेने माखलेले होते अशांच्या तीर्थयात्रा धार्मिक उत्सव पारायणे अनुष्ठाने आदि सर्वच वाया जातात शेवटी पार्थिव करावयास म्हणून त्याने मातीचा एक ढेकूळ घेतला त्याची चांदी झाली श्री स्वामींनी संकल्पसिद्धीची करामत त्यास दाखविली त्याची लोभीवृत्ती पाहून श्री स्वामींनी त्यास हाकलून दिले या लीलेचे स्पष्टीकरण वाचताना काहींना पैशाचा द्वेष केल्याचे येथे वाटेल पण तो अर्थ येथे नाही अनेकांना ते करीत असलेला प्रपंच इथली सुख दुःखे मान अपमान नाती गोती पैसा अडका स्थावर जंगम याचा प्रचंड हव्यास असतो कुटुंबाच्या पालन पोषणाकरिता समाजात बर्यापैकी सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याकरिता पैसा अडका स्थावर जंगम आदि गोष्टींची गरज असतेच परंतु ती मिळविताना आणि मिळविल्यानंतर प्रपंचात तटस्थता असावी संसार प्रपंच कर्तव्यबुद्धीने करावा त्यात गुंतून पडू नये गुरफटून जाऊ नये संसार हा चिखल समजून त्यात कमळासारखै अलिप्त राहवे आणि फुलावे हा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या