बाळाप्पा श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी स्नान करीत तेथे गरम पाणी केशर कस्तुरीचे गंध नैवेद्यास वाटीभर खीर इ.नेहमी तयार ठेवीत असे पण श्री स्वामींची राहण्याची जागा एकच नसून कधी रानात मशिदीत महारवाड्यात देवळात कोणच्याही घरी रस्त्यात अगर शेतात असे भलत्याच ठिकाणी शौचास बसावे भलत्याच ठिकाणी स्नान अशी त्यांची स्थिती असे अशाही स्थितीत बाळाप्पा त्यांची सर्व व्यवस्था पाही अशा या बाळाप्पास मात्र पाणी आणण्याची लाज वाटत असे एक दिवस श्री स्वामी महाराज म्हणाले निर्लज्जो गुरुसन्निधी श्री स्वामी वचन ऐकून बाळाप्पाने लाज सोडून दिली व तो एकनिष्ठपणे श्री स्वामी समर्थ सेवा करु लागला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

बाळाप्पा साधा सरळ मृदूस्वभावी कुणाच्याही अध्यात मध्यात न पडता श्री स्वामी सेवा करणारा एकनिष्ठ सेवेकरी होता म्हणून श्री स्वामी सुध्दा त्याच्यावर लक्ष ठेवून होते वेगवेगळ्या लीलांद्वारे त्याला प्रचिती देत होते घडवित होते तरीही त्याच्या स्वभावात वृत्तीत पाणी आणण्यासारख्या गोष्टीची लाज वाटण्याचा उणेपणा हा होताच अजून १०० टक्के तो श्री स्वामींच्या कसोटीस उतरला नव्हता पूर्वायुष्यात सधन समृद्ध असलेल्या बाळाप्पास पाणी आणण्यासारखी बारीक सारीक हलके सलकी काम करण्याची कदाचित लाज वाटत असावी तो श्री स्वामी समर्थांसारख्या ईश्वरी विभूतीच्या सान्निध्यात आणि सेवेत होता हे खरे परंतु हलकेसलके काम कसे करु ही छुपी अहंता त्याच्यात शिल्लक असल्याचे या कथा भागात दिसते ती घालविण्यासाठीच श्री स्वामी त्यास निर्लज्जो गुरुसन्निधो सदगुरुंच्या सान्निध्यात राहून असा लाजण्याचा करंटेपणा तू का करतोस असे बाळाप्पास सुनावून ते तुमच्या आमच्या सारख्या साधकासही एक प्रकारे जागरुक करीत आहेत हेच त्यांना या उदगारात सूचित करावयाचे आहे थोडक्यात म्हणजे शिष्याने गुरुशरण होऊन गुरुचरणी आपले सर्व कर्म अर्पावे हाच इथला बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या