बाबाजी सदोबा हे पोस्टल सुपरिटेंडेंट एकदा अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ दर्शनास आले दर्शन घेऊन चार दिवस राहून ते जावयास निघाले श्री स्वामींची आज्ञा घेण्यासाठी हात जोडून उभे राहिले मला जाण्यास आज्ञा असावी अशी श्री स्वामींस प्रार्थना केली किधर जाता है बैठ असे म्हणून श्री स्वामींनी त्यास थांबविले पुन्हा थोड्या वेळाने बाबाजीने जाण्याविषयी विचारले तरी श्री स्वामी महाराज परवानगी देईनात आणखी काही वेळ बसून बाबाजी आज्ञा मागू लागले तेव्हा श्री स्वामी म्हणाले नदी किनारे पार रही याचा अर्थ कोणास कळला नाही त्यांना रजा नव्हती येथे राहणे उपयोगाचे नाही म्हणून बाबाजी श्री स्वामी समर्थास दुरुनच नमस्कार करुन त्यांची नजर चुकवून कडपगाव रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा पाऊस पडून कृष्णेचा पूल वाहून जाऊन गाडी बंद झालेली होती त्यांना तेथे चार दिवस रखडावे लागले श्री स्वामी समर्थांच्या वचनाची आठवण झाली .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

सदगुरुस त्यांच्या भक्ताची काळजी असते तसे ते सूचनावजा संकेत इशारेही भक्तांना देत असतात पण आम्हास ते उमजताही नाही आणि समजतही नाही त्याचा अर्थबोधही होत नाही किधर जाता है बैठ असे सांगून श्री स्वामींनी बाबाजीस थांबविण्याचा प्रयत्न केला पुढे काय घडणार याची बाबाजीस कल्पना नव्हती ती असण्याचे कारणही नाही कारण ते सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे गृहस्थ होते पण श्री स्वामी समर्थांना पुढे काय घडणार हे माहित होते भक्तांच्या कळवळ्यापोटी ते बाबाजीस जाण्याची आज्ञा देत नव्हते या लीला कथेत बाबाजी श्री स्वामींना दुरुनच नमस्कार करुन त्यांची नजर चुकवून कडपगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करते झाले हे त्यांचे श्री स्वामींबद्दलचे घोर अज्ञानच म्हणावे लागेल कारण त्रैलोक्यातील लहानातल्या लहान अणू रेणूंच्या हालचालींचे ज्यांना अक्षरी सहज आकलन होते त्यांना बाबाजींचे ते गुपचूप निघून जाणे कळल्याशिवाय का राहिले असेल वास्तविक ते चार दिवस श्री स्वामींच्या आदेशा नुसार तेथेच राहिले असते तर बाबाजीस श्री स्वामींचा सहवास लाभला असता पण तो प्राप्त करुन घेण्या ऐवजी प्रपंच व नोकरीच्या काळजीने श्री स्वामींचा डोळा चुकवून एक प्रकारे श्री स्वामींचा आज्ञाभंग करुन ते निघाले व चार दिवस स्टेशनवरच अडकून पडले येथील पारमार्थिक बोध असाही निघू शकतो की प्रपंचाची नदी तरुन जाण्यास परमार्थ सेवेची नाव लागते अन्यथा प्रपंचाची नदी पार करणे कठीण जाते या नदीच्या प्रवाहात षडरिपूंचे भोवरे पदोपदी अडथळे निर्माण करतात परंतु ते पार करण्यासाठी श्री स्वामी समर्थांसारखा नौकेचा नावाडी आहे याचा विसर पडतो जर दृढ विश्वास असला तर जीवनाची ही नदी निर्वेधपणे पार करणे सोपे जाते परंतु बाबाजींसारखे आपण निर्वेधपणे धड प्रपंचही करु शकत नाही आणि परमार्थही साधू शकत नाही दोन्ही कडच्या ओढीने मध्येच कुठेतरी गटांगळ्या खातो मग प्रपंच करण्याचा आणि परमार्थ गाठण्याचा असे दोन्ही आनंद गमावून बसावे लागते हा सुस्पष्ट बोध करुन देणारी ही लीला आहे .

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या