सोलापुरात सिध्देश्वराच्या देवालयानजीकच एक सरोवर आहे एके वर्षी कडक उन्हाळ्यामुळे सरोवरात अजिबात पाणी नव्हते त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत होते त्यांना दोन दोन कोसावरुन पाणी आणावे लागत होते जिकडे तिकडे पाण्याअभावी हाहाकार उडाला होता श्री स्वामी समर्थ फिरत फिरत सिध्देश्वराच्या मंदिरात आले असता लोकांनी त्यांची प्रार्थना केली की महाराज पाण्याअभावी आमचे प्राण अगदी कासावीस झाले आहेत पिण्याससुध्दा पाणी मिळण्याची पंचाईत झाली आहे तरी महाराजांनी कृपा करुन आमचे प्राण वाचवावे त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले गांडी तोंडाने पाणी प्या असे म्हणून त्यांनी सरोवराच्या काठावर जाऊन लघवी केली लघवी करुन उठताच आकाश भरून आले मेघगर्जना होऊ लागली पावसाळी वारा वाहू लागला थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले तेव्हापासून त्या सरोवरातील पाणी कितीही उन्हाळा असला तरी आटत नाही 


अर्थ -भावार्थ-मतितार्थ

वरील  लीला कुणासही अदभुतरम्य व अशक्यप्रायही वाटेल परंतु ज्यांनी श्री स्वामींचे चरित्र श्री गुरुलीलामृत मा.श्री नागेश करंबेळकर यांचे समुद्र भरला आहे आदी श्री स्वामी समर्थांवरील साहित्य वाचले असेल अथवा वाचतील तर त्यांना यात काहीही आश्चर्य वाटणार नाही श्री स्वामी समर्थ हे सिध्दांचे सिध्द होते योग्यांचेही योगेश्वर होते देवांचेही देव होते ब्रम्हा विष्णू महेश यांचे ते विशुद्ध स्वरूप होते ते मायामुक्त अवधूत होते निर्गुण चैतन्याचे ते साक्षात रुप होते ते सोळा कलांनी युक्त आणि तेवीस सिध्दींनी सिध्द होते पाण्याअभावी लोकांंचे होणारे अतोनात हाल पाहून श्री स्वामी कळवळले तलावाच्या काठी जाऊन त्यांनी लघुशंका केली त्यांच्या शरीरातील आपतत्तव त्यांनी लघुशंकेच्या संकेताने मोकळे केले त्यांनी प्राकाम्य सिध्दी कार्यान्वित केली (प्राकाम्य सिध्दीने परोपकारासाठी जो संकल्प करावा तो सिध्द होतो ) त्यामुळेच तलावाच्या क्षेत्रात भरपूर पाऊस झाला सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्यास हा चमत्कार वाटेल कारण हे सर्व आकलन आपल्या आवाक्या बाहेरचे आहे श्री स्वामींनी गांडी तोंडाने पाणी प्या हे त्यांच्या व्याक्तिमत्तवाला साजेसे उदगार आहेत ते सिध्दपुरुष असल्यामुळे त्यांना ते अशक्य तेही शक्य झाले यावरून श्री स्वामी समर्थांचे अफाट सामर्थ्य सर्वसामान्यांबद्दल कळवळा या गोष्टी अधोरेखित होतात श्री स्वामी महाराज विकारमुक्त असल्याने ते अशा प्रकारे अर्वाच्य सहज बोलून जात आपणास असे शब्द ऐकून कुचंबल्यागत शरल्यागत वाटते कारण आपण विकारी आहोत त्यांच्याप्रमाणे आपण विकाररहित होण्याचा प्रयत्न करावयास हवा

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या