बुवांची आई व बायको या दोघींनी बुवांचा दोन दिवस पुष्कळ शोध घेतल्यानंतर त्या दोघी तिसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थांकडे आल्या त्यांनी श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून त्यांच्या पायावर डोके ठेवले हात जोडून उभ्या राहिल्या त्यांनी रडण्याचा आक्रोश मांडला बुवांची म्हातारी आई श्री स्वामींस म्हणाली देवा आता आम्ही काय करावे आमच्या गावी दुःखाने व दारिद्रयाने गांजलो म्हणून श्री सदगुरु दयाघनाचे पाय धरले आणि आता हा प्रकार घडला जसे बापाने मारले आईने विष दिले पावसाने भिजविले तर फिर्याद कोणाला सांगावयाची तसे आम्ही आता कोठे जावे आता आमची एवढीच प्रार्थना आहे की महाराज माझ्या मुलाचा पत्ता मला सांगावा किंवा आपल्या पायापाशी माझा देह विसर्जन करणार तर मला आत्महत्या घडू नये असा आशीर्वाद द्यावा महाराज आपण समर्थ आहात क्षणात एका ब्रह्यांडाचा नाश करुन दुसरे उत्पन्न कराल तसेच मुक्याला वाचाळ रंकाला राज्य अविद्वानाला विद्वान एका क्षणात कराल मग आमचे संकट ते किती काहीच नाही अशा प्रकारच्या आम्ही आपल्या गोष्टी बहुत ऐकल्या आणि आपली कीर्ती ऐकून इतके लांब काही तरी आपले प्रारब्ध फिरेल या हेतूने येथे आलो परंतु कर्म बलवत्तर आहे आपण तरी काय कराल पण लोखंडाला परिस लागला म्हणजे सोने व्हावयाचेच तसे आपल्या दर्शनाने पाप ताप दैन्य हे गेलेच पाहिजे म्हणून महाराज आता या दीन गाईंवर कृपा करुन संकटातून मुक्त करावे असे म्हणून दोघींनीही रडून रडून आकांत केला जवळच्या मंडळीसही गहिवर आला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
बुवांचा शोध घेण्यासाठी बुवांची म्हातारी आई आणि बायको यांनी दोन दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली कुणाही आईचा मुलगा व स्त्रीचा पती घरातून गेल्यानंतर ते शोधाशोध करणारच तशीच त्यांनी शोधाशोध केली माया प्रपंचात गुंतलेले जीव हेच करणार हे उघड आहे आईला न विचारता कुठेही न जाणारे बुवा अखेर गेले कोठे तिसऱ्या दिवशी म्हातारी आई आणि बायकोपुढे श्री स्वामी समर्थांकडे येण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता अखेरच्या आशेने त्या दोघी श्री स्वामींकडे आल्या म्हाताऱ्या आईने श्री स्वामींसमोर केलेले कथन ह्रदय पिळवटून टाकणारे आहे ते वर आले आहे श्री स्वामी समर्थ या एकमात्र देवावर त्यांची भिस्त असल्याचे म्हाताऱ्या आईच्या शब्दा शब्दांतून जाणवते ते मुळातूनच आपण सर्वांनी वाचून त्याचे मनन चिंतन करणे आवश्यक आहे त्यातूनच तिची निर्वाणीची भाषा मुलावर असलेले अफाट प्रेम इ. अनेक गोष्टी सहज बोधित होतात तिच्या या निवेदनावरुन मानवी स्वभाव त्याचे मोह मायेत नाते संबंधात गुरफटून जाणे त्या पोटी परमेश्वराची आळवणी इ. बरेच काही व्यक्त होते आपले प्रारब्ध फिरेल या उद्देशाने आल्याचे ती म्हातारी आई श्री स्वामींस सांगते येथे म्हाताऱ्या आईचे बुवांचे त्यांच्या बायकोचे असे तिघांचे प्रारब्ध असणार परंतु त्यांच्यातील नाते संबंधामुळे ते प्रारब्ध एकमेकांशी निगडित अथवा प्रभावित करणारे असणार त्या तिघांच्या प्रारब्धानुसार त्यांना त्रास सहन करावा लागत होता म्हाताऱ्या आईची तिच्या पुत्राबद्दलची आणि बुवांच्या पत्नीची तिच्या पतीबद्दलची वासना अथवा आसक्ती किती तीव्र होती हे येथे स्पष्ट होते अर्थात सर्व सामान्य जीवाबाबत असे घडतच असते वाट्यास आलेले प्रारब्ध निमूटपणे भोगावे याचा अर्थ काहीही न करता हात पाय न हालवता सर्व नशिबावर सोडून मोकळे व्हावे असे नाही निमूटपणे म्हणजे जे भोग वाट्यास आलेले असतील ते विवेकाने परंतु अलिप्तपणे सोसावे प्रयत्न हा परमेश्वर समजून सतत कार्यरत राहवे संस्कृत भाषेत सुप्रसिद्ध वचन आहे उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी उद्योगी माणसालाच लक्ष्मी वरमाला घालते या उक्तीप्रमाणेच बुवास शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या दोघींना बुवा भेटणार होते.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या