पुण्याचे नंदराम सुंदरजी गवंडी हे तीन वर्षे मूत्रकृच्छ रोगाने त्रस्त होते डॉक्टर वैद्यांचे सर्व उपाय थकले द्रव्यही पुष्कळ खर्च केले बाळकृष्ण जोशी नावाच्या गृहस्थाने गवंडी यांना सांगितले की अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन तुम्ही घ्याल तर या व्याधी पासून खचित मुक्त व्हाल त्यावर गवंडी म्हणाले ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो जोशी म्हणाले तुम्ही कृपा करुन त्यांच्या नावाने अंगारा लावा त्यावर गवंडी म्हणाले थोडा गुण आला म्हणजे मी लगेच अक्कलकोटला जाईन त्याप्रमाणे जोशींनी गवंडीस श्री स्वामी समर्थांच्या नावाचा अंगारा लावला त्याच रात्री गवंडींना आराम पडला जळजळ कमी झाली कळही कमी झाली नंतर गवंडींनी म्हटल्याप्रमाणे अक्कलकोटला लगेच येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले काही दिवस अक्कलकोटात राहिले असताना त्यांनी पुष्कळ गरिबांना अन्न वस्त्रे दिली ब्राम्हण भोजने घातली बरेच द्रव्यही खर्च केले एके दिवशी गवंडीना सोमवारचे व्रत होते म्हणून मल्लिकार्जुनाच्या दर्शनास ते गेले त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसलेली होती गवंडी आणि जोशींनी श्री स्वामी समर्थांचे प्रथम दर्शन घेऊन ते आत देवालयात गेले तेथे शंकराच्या पिंडी ऐवजी श्री स्वामी समर्थ महाराजच त्यांना दिसू लागले म्हणून ते दोघे बाहेर आले तर त्यांना ओट्यावर श्री स्वामी समर्थांना बसलेले पाहून फार आश्चर्य वाटले श्री स्वामींची स्तुती करीत ते म्हणाले हे त्रेलोक्याधिपती हे सर्वव्यापक हे देव अखिल ऐश्वर्यसंपन्न हे देव अपरिमित उदार हे देव अनाथ संकटनाशन हे देव करुणासागर त्यांचे अष्टभाव दाटून आले होते श्री स्वामींना शरणांगत होऊन ते म्हणाले आम्हा अनाथांना आपली अखंड सेवा घडावी पुढे श्री स्वामी महाराजांच्या नैवेद्यासाठी गवंडी यांनी दरमहा १० रुपयांची नेमणूक केली अशी गवंडी यांजवर प्रभूरायाची कृपा झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत असलेले नंदराम गवंडी हे साधे सरळ पण श्रीमंत गृहस्थ आहेत गवंडी आणि जोशी या दोघांच्या संवादावरुन श्री स्वामी समर्थांची महती प्रत्ययास येते श्री स्वामी समर्थांच्या नावाच्या अंगार्याने गवंडीस आराम पडला आणि कबुल केल्याप्रमाणे लगेच ते अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन येथील वास्तव्यात गवंडी यांनी अन्न वस्त्र आणि ब्राम्हण भोजनासाठी पुष्कळ द्रव्य खर्च केले त्यांच्या या कृतीने आणि धार्मिक वृत्तीने मूत्रकृच्छ रोगाचे त्यांचे प्रारब्ध बरेच क्षीण झाले सत्कर्म योगे वय घालवावे असा श्री स्वामींचाच आग्रह असे गवंडींनी तो तंतोतंत पाळला गवंडी हे या लीलेतील पात्र तुम्हा आम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे स्वार्थी आप्पलपोट्या वृत्तीने वागून निरर्थक कर्मकांड अनुष्टाने करण्यात कोणता अर्थ गवंडी आणि जोशी हे आपले पथ दीपच आहेत याच गवंडी आणि जोशींनी लीलेत केलेली श्री स्वामी स्तुती निश्चितच मननीय आणि अनुरुप आहे शंकराच्या पिंडी ऐवजी तेथे साक्षात श्री स्वामी समर्थ दिसणे आणि तेच बाहेर ओट्यावर असणे हे त्यांचे देवत्वच आहे श्री स्वामींच्या अशा अनेक लीला आहेत की ते अनेकांना अनेक रुपात एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसल्याची उदाहरणे श्री स्वामी समर्थ बखरीत व त्यांच्यावरील विविध प्रकारच्या वाडमयात आहेत गवंडी यांनी त्यावेळी दरमहा रु.१० ची तरतूद श्री स्वामींच्या नैवेद्यासाठी केली मुळात ही लीला आपल्याला खूप काही सांगून जाते आणि प्रबोधित करते सद्यःस्थितीत मूत्रपुच्छासारखा आजार झाला तर त्या रोगाशी संबंधीत असलेल्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपाय करुन घ्यावयास हवेत परंतु त्याचबरोबर योग्य मार्गदर्शकाकडून श्री स्वामी समर्थांच्या उपासने बाबतही जाणून घेतले पाहिजे श्रद्धा विश्वास सबुरी संयम या चार सूत्रांवर आधारित आचार विचार आणि व्यवहार केला तर अशक्यही शक्य करतील स्वामी याचा प्रत्यय येईल पण गुणआल्यावर नंदराम गवंडी सारखा श्री स्वामी समर्थ चरणी कृतज्ञ भावही असावयास हवा गरज सरो आणि देव विसरो ही वृत्ती साधनेत हानिकारक असते हे ही लक्षात ठेवावयास हवे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या