एकदा श्री स्वामी समर्थांनी बाळाप्पास हिशोब असू दे बरे असे सांगितले होते पुढे सुंदराबाईस श्री स्वामी सेवेतून काढल्यावर श्री स्वामी महाराज बाळाप्पास म्हणाले हिशोब घेऊन ये बरे श्री स्वामींचे बोलणे बाळाप्पास तेव्हा समजले नाही परंतु विचार करता बाळाप्पास स्मरण झाले की पूर्वी श्री स्वामी महाराजांनी हिशोब असू द्या असे सांगितले होते तेच हे असेल म्हणून बाळाप्पाने जपाची संख्या श्री स्वामी महाराजांपुढे ठेवली ती त्यांनी आपल्यापाशी ठेवून घेतली पण तेव्हा ते काहीही बोलले नाहीत एक दिवस कल्याणआप्पा वाणी श्री स्वामींच्या दर्शनास आला असता त्यास सांगितले बाळाप्पा अनुष्ठान करीत आहे त्याच्या अनुष्ठानाची सांगता करावी त्याने बाळाप्पास विचारुन ब्राम्हण भोजन घातले याप्रमाणे बाळाप्पाच्या नामजपाच्या अनुष्ठानाची त्यांनी सांगता करुन घेतली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ही लीला वर वर वाचणार्यास नामजपाचा हिशोब ठेवायचा नंतर तो श्री स्वामींपुढे ठेवून श्री स्वामी कृपेचा लाभ मिळवावयाचा इतकी साधी सोपी सरळ वाटेल पण खोलात शिरुन तिचा अर्थ भावार्थ मथितार्थ शोधू या हिशोब असू दे बरे हे श्री स्वामींचे बाळाप्पास सांगणे म्हणजे रोज किती नि कसा जप झाला याची नोंद ठेवणे अशी बाळाप्पाची आणि आपली वाचकांची समजूत होणे साहजिक आहे पण केवळ जपाची नोंद ठेवून ती जाणून घेण्यात श्री स्वामींना मुळीच स्वारस्य नव्हते परमार्थात काय किंवा उपासनेत काय नित्य जागृत आणि सावध असणे त्यांना अभिप्रेत होते म्हणजे जे नामस्वरुप आठवावयाचे उच्चारावयाचे तेच श्वासात रुजवावयाचे आणि तेच बुद्धीतही ठसवावयाचे असा जपाचा खरा अर्थ भावार्थ आणि मथितार्थ आहे त्यासाठी जपावयाच्या नामाप्रती एकाग्रता आणि प्रेम लागते ते एकदा जमले की माळेचा एक एक मणी ओढताना घेत असलेले नाम शरीरातील प्रत्येक मर्मस्थानात जाऊन रुजते एकशेआठ मण्यांची माळ असते त्याच प्रमाणे आपल्या मानवी शरीरात एकशेसात मर्मस्थाने असतात एकशे आठवा मणी म्हणजे जीव आणि त्याही वर मेरुमणी म्हणजे शिवात्मा असा हा माळेचा आणि उपासकाचा संबंध असतो म्हणजे उपासकाचा नामजप शरीरात एकशे सात मर्मस्थानात जाऊन भिडला की उपासकाची शरीरशुद्धी होते मन चित्त बुद्धी वरही प्रभाव पडतो थोडक्यात म्हणजे येथे श्री स्वामी समर्थ हे षडाक्षरी नाम श्री स्वामी उपासकाच्या हाडामासात शिरले पाहिजे ते नसा नसातून रक्तासारखे शरीरात वाहिले पाहिजे जप हा पुरा करायचा म्हणून पुरा करायचा नसतो जप हा उपासकाचा श्वास झाला पाहिजे ती त्याच्या मर्म बंधातील ठेव बनली पाहिजे उपासकास हे सर्व किती साध्य झाले याचे आकलन होण्यासाठी स्वतःच्याच आत्मपरीक्षणाची गरज असते या सर्व प्रक्रियेलाच हिशोब ठेवणे म्हणतात श्री स्वामी समर्थ हे अंतर्ज्ञानी आणि अंतःसाक्षीही होते त्यांना बाळाप्पासारख्या अथवा अन्य कोणत्याही भक्ताच्या तना मनातील सूक्ष्मातला सूक्ष्म फरकही कळणारच म्हणूनच ते सुरुवातीस बाळाप्पास बजावतात हिशोब असू दे बरे बाळाप्पाने त्या प्रमाणे केल्यावर त्यांचे पूर्ण समाधान झाल्यावर ते कल्याणआप्पा वाण्याकरवी बाळाप्पाच्या जपाची सांगता करवून घेतात जप सार्थकी लागल्याचे सूचित करतात जप साधकास प्रबोधित करणारी ही लीला आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या