इ.स.१८७४(शके १७९६) भाद्रपद वद्य षष्ठी गुरुवारी श्री स्वामी अक्कलकोटातील देशमुखांच्या वाड्यात बसले होते दिवसा तीन वाजण्याच्या सुमारास मोगलाईकडून सय्यद नावाचा एक मुसलमान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता आला सेवेकरी मंडळी श्री स्वामींच्याजवळ होती सय्यदाने दरवाजावरील मंडळीस विचारले क्यों जी अक्कलकोटके स्वामी कहॉं है ते ऐकून श्री स्वामी कडाडले स्वामी बैठे लंडपर स्वामी तो अक्कलकोट में है देखे यहॉं क्या देखते है श्री स्वामीचे हे उध्दारक भाषण ऐकताच सय्यद दोन घटका तेथेच एकदम तटस्थ उभा राहिला तो देहभान विसरला एकाग्र होऊन ध्यान अवस्थेत त्याचा अर्धा पाऊण तास गेला नंतर श्री स्वामींनीच त्याच्यावर कृपाकटाक्ष टाकून त्यास भानावर आणले सय्यद सदगदित झाला त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्र वाहत होते तो भावविवश होऊन म्हणाला गरीब नवाज परवरदिगार साहेब स्वामी महाराज आप खुदा हो बेशक भूल नही है सब जनमका सार्थक हुआ
अर्थ -भावार्थ-मथितार्थ
स्वामी तो अक्कलकोट में है असे श्री स्वामी म्हणाले याचा अर्थ अक्कल म्हणजे ज्ञान ह्यात श्री स्वामी आहेत ईश्वर प्राप्तीसाठी अनेक लोक किती यातायात करतात सव्य अपसव्य करतात हे आपण बघतो वाचतो आणि अनुभवतोसुध्दा सय्यदच्या प्रश्नाला श्री स्वामींनी लीलेत दिलेल्या उत्तराप्रमाणे किती साधे उत्तर दिले अनेकदा आपण मनन चिंतन न करता अविवेकीपणाने कर्मकांड तीर्थयात्रा अनुष्ठाने पारायणे इ.करीत असतो त्यातून काहीच साध्य न झाल्यास निराश होतो तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी अशी आपली स्थिती होऊ नये हेच श्री स्वामी समर्थांना या लीलेत म्हणावयाचे आहे
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या