पुण्याचे आप्पासाहेब सबनीस आणि त्यांच्या पत्नीस पिशाच्च बाधा होती पिशाच अंगात शिरले म्हणजे चार चार आठ आठ दिवस खाणे पिणे बंद यावर उपाय म्हणून त्यांनी अनुष्ठाने गुरुचरित्राचे सप्ताह पंचाक्षरी यांचे तोडगे आदि केले पण गुण नाही शेवटी गाणगापूर येथे जाऊन श्री दत्ताची आराधना करण्याच्या उद्देशाने गेले वाटेत अक्कलकोट लागले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले ती दिव्य मूर्ती पाहून सबनीसांचे डोळे दिपून गेले नारळ फळफळावळे श्री स्वामींपुढे ठेवून त्यांच्या चरणी नमस्कार करुन प्रार्थना केली की आम्ही गाणगापुरास व्याधिनिरसनार्थ जात आहोत आज्ञा असावी हे ऐकून महाराज म्हणाले जाऊ नका आम्ही राख रांगोळी करुन टाकू हे ऐकून ते उभयता तेथेच राहिले पाच वर्षे ब्राह्मणाकडून पादुकांवर अभिषेक गुरुचरित्राचे पारायण सेवेकर्यांस रोज माधुकरी एक भाकरी आणि एक मूद त्याचप्रमाणे ते दोघे उभयता औदुंबराला प्रदक्षिणा घालीत अशी कडक सेवा त्यांनी केली सुरुवातीस तो समंध फार दांडगाई करीत असे वाटेल ते अरिष्ट बडबडत असे परंतु जस जशी सेवा होऊ लागली तस तसा तो नरम होऊ लागला पाच वर्षांच्या सुमारास पिशाच्च सबनीसास सोडून गेला ते आरोग्य संपन्न होऊन त्यांना मोठा आनंद झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथा भागातील पुण्याचे आप्पासाहेब सबनीस ब्रह्यसमंधाच्या बाधेने त्रस्त होते त्यावर उतारा म्हणून त्यांनी केलेल्या सुरुवातीच्या उपायाचा काही एक उपयोग झाला नाही अखेरचा उपाय म्हणून गाणगापूरला जाऊन दत्तसेवा करावी असे त्यांना वाटले ते वाटणेही साहजिकच आहे कारण त्यांचे मन रुढीप्रिय देव संकल्पनेने भारलेले होते साधकबाधक विवेकपूर्ण विचार करण्याच्या ते पलीकडचे होते आपल्यातील काही लोक या सर्व भाकड कथा समजतात काही शारीरिक आजार आहे असेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देतात पण ती समाधानकारक व गुण आणणारी नसतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे अशा प्रसंगी म्हणजे भूतबाधा पिशाच्च समंधाच्या वेळी व्यक्तिपरत्वे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोणातूनच अशा दोन्ही अंगांनी विचार व्हावयास हवा असे केल्यास अनेक प्रश्न सद्यःस्थितीत सुटू शकतील दत्तसेवेसाठी गाणगापूरला जाण्याचा मनोदय व्यक्त करताच महाराज सबनीसास म्हणाले जाऊ नका आम्ही राख रांगोळी करुन टाकू यातून श्री स्वामींना हे ही सांगावयाचे आहे की दत्तप्रभू आणि आपण एकच आहोत आम्ही राखरांगोळी करु म्हणजे त्यांना असलेल्या पिशाच्चबाधेचा त्रास अक्कलकोटातच नष्ट करण्याचे एकप्रकारे अधिवचन श्री स्वामींनी सबनीसास दिले लीलेत सांगितल्याप्रमाणे पाच वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर पिशाच्च सबनीसास सोडून गेले खडतर एकनिष्ठेने सेवा केल्याचे फळ सबनीसांना मिळाले म्हणून हातची स्वामी सेवा सोडून इतरांच्या मागे लागण्यात काय अर्थ सबनीसासंबंधीच्या लीला कथेतून काय घेता येईल काय शिकता येईल थोडीशीच नगण्य उपासना करुन परमेश्वराकडून खूप अपेक्षा करणे चुकीचे आहे श्री स्वामी समर्थांना अपेक्षित असलेली उपासना जाणत्याकडून माहित करुन घ्यावयास हवी काळसुसंगत उपासना करणे केव्हाही सोयीचे असते नाही तर अनेकदा जखम डोक्याला बँडेज पायाला असे होते अशा उपासनेतून श्रम वेळ पैसा वाया जातो हाताला फारसे लागत नाही तेव्हा उपासनेतही सदसदविवेक शुद्ध निर्मळ आणि सरळ आचार विचार आणि व्यवहार अपेक्षित आहे उपासनेत सातत्य आणि वेळ याचा सुयोग्य मेळ असावा श्रद्धा आणि सबुरी असावी हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या