मुंबईचे गोविंदराव उत्तर हिंदुस्थानातील कनोजा ब्राम्हणांसह गाणगापूरला आले तेथे उपोषणे करीत असता त्यांना दृष्टांत झाला की आपण प्रत्यक्ष रुपाने अक्कलकोटात आहोत तेथे तू जा म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल दृष्टांतानुसार ते दोघे अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ते सेवा करु लागले श्री स्वामी समर्थांस नैवेद्य दाखवावा मग त्यांनी जेवावे असा त्यांचा सेवेचा क्रम पाच महिने चालू होता असेच एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे त्यांनी नैवेद्य नेला असता श्री स्वामी महाराज म्हणाले जाव गावके बाहेर मसिदमे एक फकिर और कुत्ता है उनकु खिलाव त्याप्रमाणे ब्राम्हण गावाबाहेरील फकिराकडे आला कुत्रा त्याच्याजवळ होताच ब्राम्हणास पाहून फकीर म्हणाला तुमको स्वामीने भेजा है इधर लाव असे म्हणून त्याच्याजवळील नैवेद्याचे ताट घेऊन फकिराने व कुत्र्याने तो नैवेद्य भक्षण केला थोडा वडा व खीर त्या नैवेद्याच्या ताटात तशीच ठेवून ते ताट फकिराने ब्राम्हणास परत दिले ब्राम्हण ताटातील तो प्रसाद घेऊन श्री स्वामी महाराजांकडे आला श्री स्वामींनी तो प्रसाद त्या उभयतास खाण्यास सांगितले गुरुवाक्य प्रमाण समजून ब्राम्हणाने तो प्रसाद भक्षण  केला गोविंदरावाच्या मनात मात्र तो मुसलमानाने उष्टावलेला प्रसाद कसा खावा अशी शंका आल्यामुळे तो प्रसाद खाल्ला नाही श्री स्वामी महाराज त्या कनोजा ब्राम्हणावर प्रसन्न होऊन जाव मुंबई में तुमको दस हजार रुपये मिलेंगे असा आशीर्वाद देऊन त्यास जाण्याची आज्ञा दिली गोविंदरावावर रागावून श्री स्वामी समर्थ म्हणाले तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे आणखी सेवा करावी असे सांगून त्यास सेवेसाठी स्वतःच्या पादुका घेऊन जाण्याची आज्ञा दिली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेत गोविंदरावास झालेल्या दृष्टांता वरुन गाणगापूरचे दत्तप्रभू आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ एकच आहेत हे स्पष्ट होते अक्कलकोटास येऊन गोविंदराव व कनोजा ब्राम्हण या दोघांनी पाच महिने श्री स्वामी समर्थांची भक्ती केली पण त्यांच्या भक्तीतला पक्केपणा व कच्चेपणा निदर्शनास आणून देण्यासाठी नैवेद्य फकीर कुत्रा नैवेद्य कनोजा ब्राम्हणाने तो खाणे गोविंदरावाच्या मनात शंका येणे हे श्री स्वामींनी या लीलेत अगदी सहज मार्मिकपणे दाखवून आपल्याही डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे गुरुभक्ती गुरुआज्ञा त्यातून व्यक्त होणारी गुरू निष्ठा दाखविलेली आहे कनोजा ब्राम्हण त्यात उत्तीर्ण होतो पुढे मुंबईस आल्यावर पंधरा दिवसांनंतर त्यास दहा हजार रुपये (तेव्हाचे) मिळतातसुध्दा श्री स्वामी समर्थ वचनाची प्रचिती घेऊन श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करीत तो उत्तर हिंदुस्थानात जातो मुंबईचे गोविंदराव आणि कनोजा ब्राम्हण या दोघांचीही श्री स्वामीसेवा सारखीच आणि बरोबरीने पाच महिने चालली होती परंतु त्या दोघांच्या भक्तीनिष्ठेत कच्चे पक्केपणा कसा होता हेही या लीलाकथेतून स्पष्ट होते गुरुवाक्य प्रमाण समजून त्या कनोजी ब्राम्हणाने तो प्रसाद भक्षण केला हाच कनोजी ब्राम्हणाच्या भक्तीतला पक्केपणा आणि सच्चेपणा या उलट गोविंदरावाच्या मनात मात्र मुसलमानाने उष्टावलेला प्रसाद कसा खावा ही आलेली शंका हा त्याच्या भक्तीतला कच्चेपणा आणि वृत्तीतील शंकेखोरपणा श्री स्वामी महाराज हे इतके थोर अंतःकरणाचे की ते गोविंदरावलासुध्दा स्वतःच्या पादुका देऊन अजून सेवा करावयास सांगतात भक्त वत्सलपणा हे त्यांचे बिरुद ते सोडीत नाहीत म्हणून श्री स्वामी समर्थ भक्तीत कोणतेच द्वैत नसावे हे बोधित होते तसेच या लीलेत आलेली गोविंदराव व कनोजी ब्राम्हण ह्या दोन पात्रांची सदगुरु प्रती कच्ची सच्ची भक्तीही आपणास बरेच काही सूचित करते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या