ठाकूरदासबुवांचा कुष्ठपरिहार श्री स्वामी समर्थ कृपेमुळे झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येत आणि श्री स्वामींजवळ कीर्तन पूजन करीत एके दिवशी बुवांच्या मनात आले की श्री स्वामींपासून गुरुपदेश मिळावा त्यावर श्री स्वामी बुवास रागावून म्हणू लागले हमकू कायकू सताता है हम पंतोजीपण नही करता गाँठके गुरु बाटके चेले हम करते नही देखे परंतु पुढच्या वर्षी बुवांनी निर्धारच केला की मरण आले तरी पुरवले पण श्रीस्वामींचा अनुग्रह घ्यायचाच असा निर्धार करुनच बुवा श्री स्वामी समर्थांपुढे उभे राहिले तेव्हा रागावून म्हणाले निकल जाव जूता मारेंगे श्री स्वामींचे हे कठोर शब्द ऐकताच बुवांचे मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टींचे स्मरण झाले (स्वामी रामानंदांनी कबीराला पायातली खडावा फेकून मारली होती ) बुवांचे हे मनात येताच श्री स्वामी म्हणाले तेरा कबीर झक मारता है हम कुछ परवाह नही रखते हे शब्द कानी पडताच श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

बुवांना श्री स्वामी समर्थांनी विसरलेल्या कस्तुरीचे स्मरण करुन देऊन आश्चर्याचा धक्का दिला बुवाकडे चुलीतील फेकलेले जळके लाकूड उगाळून लावण्यास सांगितले बुवांनी तसे करताच काही दिवसांतच बुवांचे कोड नाहीसे झाले यामुळे बुवांची श्री स्वामी समर्थांवरील निष्ठा पक्की झाली अशा सामर्थ्यशाली अवतारी गुरुचा अनुग्रह (शिष्यत्व) मिळावा अशी बुवांची तगमग सुरू झाली श्री स्वामींना ते सर्व जाणवत होते तरीही कठोरात कठोर कसोट्या लावूनच अनुग्रह देण्याची पध्दत तेव्हा होती आता मात्र कसे आहे आला माणूस की धर त्याला आणि कर शिष्य हे कमी की काय म्हणून एकाच वेळी अनेकांना सामूहिक अनुग्रह देणारेही आहेत आणि घेणारेही आहेत यावरुन आता अध्यात्मातला परमार्थातला व्रतस्थपणा जाऊन त्यास बाजारी स्वरूप आल्याचे दिसते गाँठ के गुरू बाटके चेले करण्याची दुकानदारी सुरू झाल्याचे दिसते श्री स्वामी समर्थांसारख्या अवधूत वृत्तीच्या सदगुरुला ते कदापि मान्य होणारे नव्हते म्हणूनच ते बुवांस म्हणाले हमकू कायकू सताता है हम पंतोजीपण नाही करता गाँठके गुरू बाटके चेले हम नही करते या उदगारावरुन कुणाही उपासकास स्वामींची अनुग्रह देण्याबाबतची भूमिका सहज लक्षात यावी निकल जा यहाँसे जूता मारेंगे अशा शब्दात बुवांना श्री स्वामींनी फटकारले झिडकारले पण बुवास याचा राग तर आला नाहीच उलट रामानंद स्वामींनी कबीराला खडावा फेकून मारल्याचा प्रसंग बुवांस आठवला श्री स्वामींचे आपणास फटकारणे झिडकारणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपाच झाली असा ठाकूरदासबुवांचा ग्रह झाला अर्थात सर्वज्ञ श्री स्वामींना हे सर्व कळत होते म्हणून ते पुन्हा कडाडले तेरा कबीर झक मारता है हम कुछ नही पर्वा रखते परंतु दृढनिश्चयी बुवा तेथून हालावयास तयार नव्हते बुवांच्या या दृढनिश्चयाने श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर प्रसन्न झाले या लीलेतून हाही बोध घ्यावा की श्री स्वामी समर्थांची उपासना करु इच्छिणाऱ्यांनी आपला दृढ निश्चय टणक मानसिकता आणि श्री स्वामींप्रती दृढ निष्ठा पुन्हापुन्हा तपासून पाहावी त्यातील कच्चे दुवे प्रयत्नपूर्वक काढून टाकावे श्री स्वामी सतत परिक्षा घेत असतात हे लक्षात असू द्यावे उपासनेत वेदना कष्ट त्रास हा होत असतो अडचणी येतच असतात पण श्री स्वामी अंतिमत खरेखुरे यश समाधान देत असतात हा पक्का भरवसा ठेवावा .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या