श्री स्वामी समर्थ कृपेने कुष्ठरोग गेलेला शूद्र दरवर्षी सहकुटुंब अक्कलकोटास श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येत असे एकदा तो दर्शनास आला असता श्री गुरू दत्तात्रेय त्याला म्हणाले तुझ्या परसात नूतन औदुंबराचा वृक्ष रुजला आहे त्याच्याखाली पादुका स्थापन कर अशी त्यास आज्ञा झाली तो शूद्र घरी येऊन पाहतो तो श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या परसात औदुंबराचे रोप रुजले होते श्री दत्तात्रेय महाराज आपल्या घरीच आल्याचे त्याला वाटले त्याला खूप आनंद झाला समर्थकृपेने मग त्याला द्रव्यार्ह मिळाले त्याने तेथे पादुका स्थापन करुन देऊळ बांधले व तो तेथे सेवा करीत राहिला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

तो कुष्ठरोगी शूद्र कुष्ठरोगामुळे जीवनातून उठलेला एक उपेक्षित जीव होता परंतु श्री स्वामी समर्थांनी त्याच्यावर कृपा केली त्याचा कुष्ठरोग बरा होऊन पुन्हा तो तुमच्या आमच्या सारखे जीवन जगू लागला पण हे सर्व कुणामुळे झाले याची त्याला जाण होती म्हणून त्या कृतज्ञ भावनेने तो दरवर्षी अक्कलकोटला श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास सहकुटुंब येत असे असे आपण कृतज्ञ असतो का खरं तर असायलाच पाहिजे गरज सरो आणि वैद्य मरो अशी वृत्ती उपासनेत अथवा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार कृपा नको करणाऱ्याबाबत नसावी ह्या शूद्राची प्रेम भक्ती पाहून श्री स्वामींनी त्यास पादुका कोठे स्थापन करायच्या याचा प्रत्यक्ष निर्देश दिले त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तेथे त्यास औदुंबराचा रुजलेला वृक्ष आढळला त्याने त्यांच्या आज्ञेनुसार श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापन तेथे केली जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे याची रोकडी प्रचिती त्या शूद्रास आणून दिली श्री स्वामी समर्थांपुढे शूद्र असो की ब्राम्हण सर्व समान होते भेदाभेद भ्रम अमंगळ असा त्यांचा प्रत्येकाच्या बाबतीत भाव होता त्या कुष्ठरोगी शूद्राचे कुष्ठ गेले शरीर तुमच्या आमच्यासारखे झाले औदुंबराचे झाड कोठे आहे याचे निर्देश त्यांनी दिले पादुका स्थापन करण्याची आज्ञा दिली म्हणजे पादुकांच्या रुपाने त्यांचे नित्य वास्तव्य त्या शूद्राबरोबर होते वरील विवेचनातून तुम्हा आम्हास योग्य तो बोध मिळण्यास अडचण पडू नये 

टीप - ह्या लीलेत व इतर काही लीलांमध्ये शूद्र असा उल्लेख श्री स्वामींच्या वेळचा आहे तेव्हा सामाजिक स्थिती जाती पातीने ग्रस्त होती पण श्री स्वामींनी तर त्यावरच प्रहार केले येथे विशिष्ट जातीला कमी लेखणे हा उद्देश नाही.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या