बडोद्याच्या (गुजरात) हरिश्चंद्र गोपालजीच्या घरी एक ब्राम्हण दोन हजार रुपयांची चोरी करुन फरारी झाला चोरीचा पुष्कळ तपास करुनही हरिश्चंद्र गोपालजीला चोराचा पत्ता लागेना पुढे ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांना चोरीबद्दल विचारले तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले तुमचा चोर मोगलाईत अमुक गावी पकडकर रखा है त्याने श्री स्वामींनी सांगितलेल्या गावी मोगलाईत जाऊन तपास केला तेव्हा त्यास चोर सापडून त्याचा सर्व मालही मिळाला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांची ही लीला आपणास साधी सोपी सरळ वाटेल वरवर ती तशी दिसेल पण त्यातील मथितार्थ गूढ अर्थ जाणला तर ती निश्चितच आपणा सर्वांस बोधप्रद ठरेल या लीलाकथेतील बडोद्याच्या हरिश्चंद्र गोपाळजींच्या घरी एक ब्राम्हण दोन हजाराची चोरी करुन फरार होतो पुष्कळ तपास करुन तो अयशस्वी ठरतो म्हणून तो अक्कलकोटात म्हणजे सहस्त्रात येतो तेथे विवेक स्वरुप सदगुरु असतो (श्री स्वामी समर्थ) त्यांच्या कानावर तो चोरीचे गार्हाणे घालतो तेव्हा सदगुरु श्री स्वामी समर्थ त्याला दिलासा देतात तुमचा चोर मोगलाईत अमुक गावी पकडकर रखा है असे सांगतात श्री स्वामींच्या या उदगारातील मोगलाई कोणती आपण मोगलाई शब्द कसा व केव्हा वापरतो ही मोगलाई काय आहे ही मोगलाई म्हणजे आपल्या नरदेहात आसक्तीने (षडरिपूंनी) घातलेला गोंधळ मांडलेला उच्छाद आहे या मोगलाईतील ह्रदय स्थानात हा चोर पकडून ठेवलेला आहे संत जनाबाईचा या संदर्भातील अभंग मोठा मार्मिक आणि आशयगर्भ आहे त्या म्हणतात धरिला पंढरीचा चोर बांधूनी भक्तीचा दोर ह्रदयबंदीखाना केला आत विठ्ठल कोंडिला हेच येथे श्री स्वामी महाराज निदर्शनास आणून देतात या लीला कथेतील मोगलाई म्हणजे मोगलाईतील कारभार जसा अस्ताव्यस्त अवाढव्य गोंधळाचा कशाचा कशाशीही ताळमेळ पायपोस नसलेला हम करे सो कायदा असा हडेलप्पीचा होता तसाच काहीसा आपल्या देहातील कारभार आपला आचार विचार आणि मनोभाव अनेकदा असतो म्हणून त्यास श्री स्वामींनी मोगलाई म्हटले आहे श्री स्वामींचे हे वाक्य मोठे मार्मिक आणि मर्मग्राही आहे त्याचा शांत चित्ताने विचार करुन आपण आपला आहार विहार विचार चिंतन मनन यांची एक स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे तरच अस्ताव्यस्त वागण्याच्या आपल्या मोगलाईला आळा बसेल व देव भेटेल.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या