मंगळवेढ्याचा गरीब बसाप्पा तेली एकदा जंगलात फिरत असताना त्याने कंटकाच्या शय्येवर निजलेल्या श्री स्वामी समर्थांना पाहिले पुढे तो त्यांची एकनिष्ठेने भक्ती करु लागला घरी त्याची बायको मोलमजुरी करुन पोट भरीत असे घरी इतके दारिद्रय असून नवरा एका वेड्याच्या (श्री स्वामींच्या )नादी लागल्याचे ऐकून फार दुःखीकष्टी होत असे इकडे बसाप्पाची भक्ती पाहून श्री स्वामी महाराज त्याच्या वर प्रसन्न झाले त्यास जंगलात घेऊन गेले एकाएकी काटबनच्या जंगलात जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प दिसू लागले बसाप्पा त्या दृश्याने घाबरला तो श्री स्वामींचे चरणी लागला तेव्हा श्री स्वामींनी त्यास अभय देऊन म्हटले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून हवे तेवढे घे घाबरू नको श्री स्वामींवर विश्वास ठेवून बसाप्पाने अंगावरील वस्र एका सर्पावर घालून भीत भीत तो एक सर्प वस्रात गुंडाळून हस्तगत केला आणि सर्प असलेले ते गाठोडे बगलेत ठेवले नंतर बसाप्पा व श्री स्वामी समर्थ गावाकडे परतले गावाजवळील एका बागेत श्री स्वामी बसले व त्यांनी बसाप्पास आज्ञा केली तुझ्या काखेत जे धन आहे ते घेऊन स्त्रीपुत्रासह आनंदाने राहा श्री स्वामीचरणांवर मस्तक ठेवून बसाप्पा घरी आला पतीला घरी आलेले पाहताच बसाप्पाच्या पत्नीस आनंद झाला तिने त्याच्या काखेतील गाठोडे काढून सोडून पाहिल्यावर सर्पाऐवजी बावन्नकशी सोन्याची लगड त्या दोघांच्या दृष्टीस पडली त्यांना परम आनंद झाला पुढे त्यास कधीच दारिद्रय आले नाही श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा हाच बसाप्पा प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येत असे ही लीला शके १७६६ (इ.स.१८४४) मध्ये मंगळवेढ्याजवळील काटवनाच्या जंगलात घडली
अर्थ / भावार्थ / मथितार्थ
समाजातल्या सर्वसामान्य उपेक्षितांना आधार मदत देण्यासाठीच श्री स्वामी समर्थांचा अवतार होता हे या लीलेतून स्पष्ट होते बसाप्पाच्या भाग्योदयाची वेळ आली होती तो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस लागला त्या भक्तीपुढे त्याने स्वतःच्या पत्नीचाही विचार केला नाही त्याची पत्नी मात्र संसारवासनेत अडकलेली असल्यामुळे तिला तिच्या पतीचे श्री स्वामीचरणी लागणे हे एखाद्या वेड्याच्या नादी लागल्यामुळे एक खूळच वाटले प्रबळ वासना मग ती कोणतीही का असेना ती ईश्वर सेवा करु देत नाही ते बसाप्पाच्या पत्नीच्या पात्रातून स्पष्टच दिसते अनन्यभावे माझे चिंतन करणाऱ्याचा योगक्षेम मी चालवीन याची प्रचिती श्री स्वामी या लीलेत आणून देतात स्त्री पुत्रासह आनंदाने राहा प्रपंच नेटका कर माझ्या सेवेसाठी घरादाराचा प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही हेही या लीलेतून प्रबोधित होते संसार प्रपंच करताना श्री स्वामींचे स्मरण स्वतःचा भाग्योदय झाल्यानंतरही बसाप्पा प्रतिवर्षी अक्कलकोटला श्री स्वामी दर्शनासाठी अखेरपर्यंत जातच राहिला श्री स्वामींप्रती विनम्र मनोभाव यातून प्रगट होतो
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या