श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांसह नरसाप्पाच्या शेतात हुरडा खाण्याकरिता गेले नरसाप्पाने हुरड्याबरोबर खाण्याकरीता ऊसही आणलेले होते ऊस खाऊन श्री स्वामींनी ऊसाची कांडकी जमिनीत पुरुन ठेवली तेव्हा नरसप्पा सुतारास वाटले की आपण शेतात ऊस लावावा अशी श्री स्वामी महाराजांची इच्छा असावी असे समजून त्याने शेतात ऊस लावला तो उत्तम प्रकारचा होऊन त्यास दरसालापेक्षा वीसपट उत्पन्न मिळाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

नरसप्पा श्री स्वामी समर्थांमुळे सरळ झाल्यावर ते सेवेकर्यांसह त्याच्या शेतात हुरडा खाण्यास गेले तेथे त्यांनी ऊस खाता खाता ऊसाची कांडी जमिनीत पुरुन ऊसाचे पीक घेण्याचा संकेत त्यास दिला न बोलता संकेत देण्याची त्यांची पध्दत अन्य लीलांमध्येही आहे या लीलेत श्री स्वामी समर्थांचे वसु स्वरुप जाणवते शेतीवाडी घरे दारे धन दौलत गाई गुरे पीके फळे आदि निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा तो वसु श्री स्वामी समर्थ हे वसुस्वरुप होते आणि सध्या निर्गुणातही तसे ते आहेत त्यांनी नरसाप्पावर कृपा करुन आपले वसुस्वरुप दाखवले ऊसाची कांडकी त्यांच्या जमिनीत पुरुन त्याला ऊस लावण्याचा संकेत दिला त्यातून त्यास वीसपट उत्पन्नही मिळवून दिले हे सर्व घडले ते श्री स्वामी समर्थ कृपेमुळे हा या लीलाकथा भागाचा महत्त्वाचा अर्थबोध आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे कोरडे शुष्क नामस्मरण नव्हे निव्वळ भजन पूजन पारायणे ताला सुरात म्हटलेल्या आरत्या नव्हे अर्थात हे करु नये असा याचा अर्थ नाही हार प्रसाद पेढे श्री स्वामींना अर्पण केले काय आणि नाही काय त्याने काही फरक पडत नाही ते अर्पण केलेच पाहिजे अशी सक्ती नाही पण त्यांच्या प्रती असलेली भक्ती निष्ठा आणि त्यांना अपेक्षित असलेला निर्मळ निर्मोही पवित्र आचार विचार आणि व्यवहार असावा यातून असाही अर्थबोध घेता येईल की श्री स्वामी समर्थांनी ऊसाची कांडी चावून चोखून खाल्ली तशीच भगवदभक्तीच्या रसाची गोडी चाखावी शेतातल्या जमिनीत काही कांडी पुरली याचा मथितार्थ असा की भगवदभक्तीने आपली मनोभूमी चांगली तयार करुन त्यात श्री स्वामी समर्थ भक्तीचा ऊस लावावा तुम्ही एक पटीने पेरा श्री स्वामी समर्थ वीस पटीने नव्हे तर अनंतपटीने तुमच्यावर कृपा करतील हा यातला खरा बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या