एकदा अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ विहिरीच्या कठड्यावर बसलेले असताना तेथे चिमा नावाची सेवेकरीण त्यांच्या दर्शनास आली तिच्या हातात असलेला तांब्या त्यांनी विहिरीत फेकून दिला ती रडत रडत त्यांना म्हणाली महाराज मी पाणी कशाने पिऊ तेव्हा ते तिला म्हणाले विहिरीत उडी टाकून तुझा तांब्या काढून घे तिने काहीही विचार न करता विहिरीत उडी मारली ती विहिरीच्या तळाला गेली लोक तिला काढण्यासाठी विहिरीत उतरु लागले तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणाले कोणी तिला काढू नका लोक म्हणू लागले महाराज चिमा बुडून गेली आता तिचे प्रेत काढले पाहिजे लोकांचे हे म्हणणे ऐकून श्री स्वामी समर्थ हसू लागले व म्हणाले रांड बुडते कशाने आता वरती येईल तेवढ्यात चिमा तांब्या घेऊन वरती आली तिने हसत हसत श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचे दैवी सामर्थ्य दर्शविणारी ही लीला आहे चिमास विहिरीत उडी टाकण्यास श्री स्वामी सांगतात ती सुद्धा श्री स्वामींच्या दैवी सामर्थ्यावर विश्वास ठेवून मागचा पुढचा कोणताही विचार न करता विहिरीत उडी टाकते लोक चिमाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सरसावतात चिमास काढू नका म्हणून श्री स्वामी सांगत असतात महाराज चिमा बुडून गेली आता तिचे प्रेत काढले पाहिजे असे तेथे जमलेले लोक बोलतात त्यांच्या या उदगारातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक तर लोकांचा साधा सरळ भोळेपणा दुसरे श्री स्वामी समर्थांसारख्या अक्कलकोटात सदेह वावरणार्या दैवी अवताराबद्दल घोर अज्ञान अथवा अनभिज्ञता सूर्य आपणास किती प्रकाश देतो हे सर्वच वर्णना पलीकडचे आहे पण त्याचा आपण खोलवर विचार कधी करीत नाही जाणून घेत नाही म्हणून त्याचे महत्त्वही वाटत नाही असेच काहीसे त्या लोकांचे श्री स्वामींबाबत झाले होते म्हणून त्यांच्या अज्ञानातून ते म्हणाले चिमा बुडून गेली आता तिचे प्रेत काढले पाहिजे पण महाराज ठामपणे सांगतात ती बुडते कशाने आता वरती येईल आणि घडतेही तसेच अशा सामर्थ्यशाली लीला दाखविणार्या श्री स्वामी समर्थांचा गुण ३० एप्रिल १८७८ पर्यंत होता परंतु त्यानंतरही ते आता या क्षणापर्यंत प्रचिती देत आहेत की मैं गया नहीं जिंदा हूँ या त्यांच्या अजरामर उदगाराचा आजही अनेक सेवेकरी अनुभव घेत आहेत.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या