शेषाचार्य अग्निहोत्री बुवांच्या मनात पश्चात्तापाची भावना निर्माण झाली बुवांनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली महाराज मी महान पातकी आहे कृपा करुन माझा अव्हेर न करता दयासागरांनी माझ्या अपराधाची क्षमा करावी मी यापुढे पुन्हा कधीही आपल्या जवळ पेढे बर्फी मागणार नाही आणि जर मागितली तर हे शेणच खाईन असे म्हणून बुवांनी आपल्या तोंडात शेण घातले त्यांच्या डोळ्यातून पश्चात्तापाच्या अश्रू धारा वाहत होत्या सर्व घोळ घालून झाल्यावर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाते वेळी बुवांनी असे चिंतन केले की हाच जर माझा खरा अपराध असेल तर दयाघन श्री स्वामी महाराज मला पूर्वीप्रमाणेच दर्शन देतील असे मनोमन म्हणत श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बुवा आले बुवांना पाहताच श्री स्वामी महाराज हसू लागले आणि म्हणाले अहो बुवा बर्फी पोटभर खाल्ली का आणा (तपकिरीची) चिमूट इकडे श्री स्वामी समर्थ पोट धरुन हसू लागले बुवास खूप आनंद झाला त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्र् वाहत होते श्री स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला हात जोडून बुवा म्हणाले महाराज चांगले जोडे मारलेत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

बर्फी पेढे यासारखा क्षुल्लक प्रसाद न मागण्याची कबुली शेषाचार्य अग्निहोत्री बुवांनी दिली पश्चात्तापाने त्यांचे मन आता शुध्द स्वच्छ झाले बुवांनी स्वतःच्या तोंडात अक्षरशः शेणच घातले यावरुन त्यांना त्यांच्या अपराधाची किती उपरती झाली याची कल्पना येते केलेल्या अपराधाची जाणीव म्हणजे सुधारणेचे एक पाऊल पुढे टाकण्यासारखे असते प्रपंचात जीवनात चुका ह्या होणारच पण त्याची उपरती होऊन पुन्हा सही मार्गावर येणे केव्हाही चांगलेच यातूनच खर्या खुर्या आत्मिक सुखाच्या मार्गाने साधक चालू लागतो या लीलाकथेत अखेरच्या भागात श्री स्वामींनी बुवांच्या बाबतीत तोच महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला श्री स्वामी समर्थांचे मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की ते त्यांच्या भक्तांवर सेवेकर्यांवर सदैव लक्ष ठेवून असतात त्याची आचार विचार शुध्दता निष्ठा विविध प्रसंगातून तपासतात परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला वार्यावर सोडत नाहीत म्हणूनच या लीलाकथेच्या अखेरीस श्री स्वामी उपरोधाने परंतु मार्मिकपणे विचारतात अहो बुवा बर्फी पोटभर खाल्ली ना बुवांना त्यांची चूक कळते चूक कळणे महत्त्वाचे त्यात सुधारणा करुन विवेकाने वर्तन करणे त्याहून महत्त्वाचे ते बुवात झाल्याचे श्री स्वामींना जाणवल्या नंतरच ते बुवांकडे मोठ्या प्रेमाने चिमूटभर तपकिरीची पूर्वीप्रमाणे मागणी करतात महाराजांची भक्तांना जोडे मारण्याची ही अनोखी पध्दत येथे दिसते तेव्हा आपण काय मागावे आणि काय मागू नये याचा स्पष्ट बोध होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या