बरसोरजी हे पारशी गृहस्थ अक्कलकोटात कामदार होते एके दिवशी मुंबईचे त्यांचे आप्त नवरोजी त्यांना भेटण्यास अक्कलकोटी आले बंगल्याची दारे खिडक्या लावून रात्री ते दोघेही श्री स्वामी समर्थांच्या लीलांबद्दल बोलत होते परंतु लीला नवरोजीस खर्या वाटेनात इतक्यात श्री स्वामी महाराज अकस्मात त्या दोघांच्यामध्ये येऊन बसले त्या दोघांनाही आश्चर्य वाटले श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घालून नवरोजी म्हणाले महाराज दारे खिडक्या बंद असता आपण कसे आलात पुढे त्याने प्रार्थना करुन म्हटले महाराज मला कर्ज झाले आहे ते फिटून पुष्कळ संपत्ती मिळावी अशी श्री स्वामी चरणांजवळ विनंती आहे त्यावर श्री स्वामी म्हणाले मिळाल्यावर काय देशील प्राप्तीचा चौथा हिस्सा देईल नवरोजी उत्तरले प्राप्तीचा चौथा हिस्सा देईन श्री स्वामी समर्थ म्हणाले नर्मदेकडे जा असे सांगून ते एकाकी गुप्त झाले दुसऱ्या दिवशी नवरोजी रामपुरास श्री स्वामींच्या दर्शनास गेला गुजरात देशीचे बोलावणे आले आहे श्री स्वामी मुखातील हे वाक्य ऐकून ते मुंबईस आले तेथे येताच बडोद्याहून श्रीमंत मल्हारराव गायकवाडांचे बोलावणे आल्याचे त्यांना समजले ते ताबडतोब बडोद्यास (गुजरात) आले ते श्रीमंताना भेटताच त्यांनी नौरोजीस सन्मानपुर्वक द्रव्य आणि वस्त्रालंकार देऊन सांगितले की अक्कलकोटचे महाराजास कसेही करुन इकडे घेऊन या त्यानुसार त्यांनी ब्राम्हण भोजन घातले नंतर प्रार्थना करुन श्री स्वामींस सांगितले की महाराज आपणास श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी बोलविले आहे त्यावर श्री स्वामी म्हणाले आम्ही येत नाही जा असे ऐकताच नवरोजी मुंबईस निघून आले त्यांनी महाराज तिकडे येत नाहीत पुष्कळ खटपट केली परंतु व्यर्थ गेली असे कळविले नवरोजीस श्री स्वामी कृपेने पुष्कळ द्रव्य मिळून ते कर्जमुक्त झाले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलाकथेत बरसोरजी हा श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असलेला तर त्याचाच मुंबईचा आप्त नवरोजी हा श्रद्धा नसलेला अशा दोन पारशी गृहस्थांची वर्णने आली आहेत ते दोघेही दारे खिडक्या बंद करुन श्री स्वामी समर्थांच्या लीलांविषयी बोलत असताना श्री स्वामी तेथे प्रगट झाले यामुळे अश्रद्ध असलेल्या नवरोजीच्या मनातील संशय नाहीसा झाला त्यातच लीलेत वर्णन केल्याप्रमाणे श्री स्वामी गुप्त झाले ही त्याला दुसरी प्रचिती आली त्यामुळे नवरोजीची श्री स्वामी समर्थां वरील श्रद्धा अधिक बळकट झाली नवरोजीचा भाग्योदय कोठे होईल हे ही श्री स्वामींनी त्यास सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यास बडोद्याच्या श्रीमंत मल्हारराव गायकवाडांकडून पुष्कळ द्रव्य मिळाले श्री स्वामी मुखातील वचन गुजराथ देशीचे बोलावणे आले आहे जा ते खाली कसे जाईल श्री स्वामी कृपेने नवरोजीचे कर्जही फिटले श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचा पुष्कळ प्रयत्न करण्यात आला पण ते बडोद्यास काही गेले नाहीत आम्ही येत नाही जा असे त्यांनी नवरोजीजवळ ठामपणे सांगितले पैसा अधिकार सत्ता यांच्या बळावर देवास जिंकता येत नाही त्याला अंंतःकरणापासून भक्तिभाव लागतो श्री स्वामी समर्थ हे तर भक्ती वेडे भक्त वत्सल होते पण सद्यःस्थितीत एखाद्या उच्च अधिकाऱ्याने श्रीमंताने राजकारण्याने अथवा उच्च पदस्थाने आताच्या साधू संत बापू महाराज माउली आदींना कसेही करुन इकडे घेऊन या असा सांगावा धाडला असता तर वाचकांनीच विचार करायचा आहे थोडे फार सन्माननीय अपवाद असतीलही परंतु स्वामी समर्था सारखे पूर्णतः विरक्त अनासक्त निर्मोही फारच थोडे जवळ जवळ नाहीच यावरुन श्री स्वामींच्या शब्दालाही सत्याचे आणि मंत्राचे सामर्थ्य का व कसे होते हा अर्थबोध मुंबईच्या नवरोजी या पारसी गृहस्था वरुन मिळतो.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या