मुंबईचे विष्णूबुवा ब्रम्हाचारी (जोग) हे विव्दान होते त्यांनी त्या काळी पाद्री लोकांबरोबर वाद करुन त्यांचीही मते खंडित केली होती ते उत्कृष्ट वक्ते होते ते वेदान्तावर उत्तम व्याख्याने देत त्यांचा हा लौकिक ऐकून त्यांना अक्कलकोटात प्रवचने देण्यासाठी पाचारण करण्यात आले एके दिवशी श्री स्वामी समर्थांजवळ जाऊन वेदान्तावर भाषण करावे असे विष्णूबुवांच्या मनात आले त्याप्रमाणे त्यांनी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन वेदान्तावर पुष्कळ वेळ भाषण केले शेवटी बुवांनी श्री स्वामींस ब्रम्हतदाकारता कशी असा प्रश्न केला श्री स्वामींनी बुवांच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या परंतु उत्तर म्हणून काही दिले नाही तेव्हा बुवांस श्री स्वामी वेडे आहेत आणि उगाच यांची कीर्ती झाली आहे आपण मात्र मोठे विद्वान व श्री स्वामींपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अहंभाव निर्माण झाला त्या उन्मादातच बुवा त्यांच्या बिर्हाडी (मुक्कामाच्या ठिकाणी) परतले त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा त्यांना भास झाला बुवा घाबरले भयभीत झाले त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत ते उठले आपण श्री स्वामी समर्थांस नावे ठेवले त्याचे तर हे फळ नसेल ना अशी शंका त्यांच्या मनात आली दुसऱ्या दिवशी ते श्री स्वामी महाराजांकडे आले त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा त्यांनी वेदान्तावर भाषण सुरू केले ब्रम्हतदाकारता कशी व कोणत्या साधनाने होते असा प्रश्न त्यांनी पुन्हा श्री स्वामी महाराजांस केला त्यावर श्री स्वामी बुवास म्हणाले हात गाढवा स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदान्ताच्या करतोस तर तू केवळ पढतमूर्ख आहेस ब्रम्हतदाकारता काय वाटेवर पडली आहे पुष्कळ वाचाळपणा करुन ब्रम्ह बोलून कोटीवर कोटी वेदान्त बोललास म्हणून योगी झालास काय आल्या वाटेने चालता हो
अर्थ -भावार्थ -मथितार्थ
अनेकदा अनेकांना सत्ता संपत्ती ऐश्वर्य विद्या विद्वत्ता सामर्थ्य तारुण्य रुप सौंदर्याचा गर्व होत असतो यातूनच त्या व्यक्तीच्या मी पणाचा अहंभाव पोसत जातो त्या अहंभावाच्या कैफात अथवा नशेत ती व्यक्ती सारे काही विसरते असेच काहीसे वरील लीलाकथेतील विष्णूबुवांचे झाले होते विद्वत्तेच्या अहंभावात अहंगंडावर पोसलेल्या विष्णूबुवांना श्री स्वामी समर्थ कोण आहेत त्यांची योग्यता काम त्यांचे सामर्थ्य काय हे जाणून घेण्याची गरज वाटली नाही त्यांच्या विद्वत्तेने ते नम्र विनयशील विवेकी बनण्याऐवजी अहंकार त्यांच्या डोक्यात गेला होता त्यामुळे त्यांची सारासार विवेकशीलता कुंठित झाली होती ह्याच स्थितीने बुवांना अखेरीस श्री स्वामी समर्थांपुढे पराजित व्हावे लागले फजित पावावे लागले अशा स्वरुपाच्या अहंकारावर पोसलेली अनेक माणसे पुरातन काळापासून तर कलियुगात आजही पाहावयास अनुभवास येतात विनम्र मनुष्य परमेश्वरासही जवळ करु शकतो नम्र झाला भूता त्वाने कोंडिले अनंता हाच बोध ही लीला करुन देते.
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या