हैद्राबादच्या लालासाहेबास श्वेतकुष्ठ रोग झाला त्यामुळे ते फार काळजीत पडले होते त्यांना कुणीतरी आलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे तेथे अनुष्ठान केल्यास गुण येईल असे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी तेथे सहा महिने अनुष्ठान केले पण गुण नाही पुढे एके दिवशी हैद्राबादेत ते माडीवर निजले असता असा दृष्टांत झाला की एक सुंदर आणि पुष्ट गाय त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा त्यांना असे वाटले की जिना चढून गाय वरती कशी आली ही जागृती आहे की स्वप्न असा विचार करीत असता गाईच्या पाठीमागे भगवी वस्त्रे धारण केलेली एक भव्य आणि तेजःपुंज मूर्ती दिसली त्या मूर्तीला वंदन करुन आपण कुठले ही गाय कोणाची दारे खिडक्या बंद असता आपण जिना चढून वर कसे आलात आदी प्रश्न त्यांनी विचारले त्यावर ते साधू बोलले ही गाय आमचीच आहे आम्ही गाणगापूर सोलापूरच्या मधे राहतो जाण्या येण्याला कोठेच प्रतिबंध असत नाही आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी दृष्य अदृष्य रुपाने जात असतो असे म्हणत ते साधू दिसेनासे झाले दुसरे दिवशी लालासाहेबांची एका सत्पुरुषाची गाठ पडली त्यांनी स्वप्नातील वृतांत त्यांना सांगितल्यावर त्या सत्पुरुषांनी सांगितले तुम्ही अक्कलकोटास जा त्या ठिकाणी महात्मे आहेत ते तुम्हाला आरोग्यसंपन्न करतील यात संशय नाही रात्रीचा स्वप्न दृष्टांत आणि सत्पुरुषाचे सांगणे यांचा मेळ बसला स्वप्नदृष्टांतातील मूर्ती अक्कलकोटचीच असावी अशी त्यांची खात्री झाल्याने हैद्राबादच्या लालासाहेबांनी अक्कलकोटचा रस्ता धरला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील लालासाहेबास श्वेतकुष्ठ झाल्यामुळे फार काळजीत होते या कथेतला चित्तवेधक भाग म्हणजे ते माडीवर निजले असताना त्यांना झालेला स्वप्नदृष्टांत त्यांनी साधूस विचारलेले प्रश्न आणि साधूने दिलेली उत्तरे यावरुन श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व प्रतीत होते कारण लालासाहेब एका सत्पुरुषाच्या निर्देषानुसार जेव्हा अक्कलकोटला येतात तेव्हा स्वप्न दृष्टांतातील मूर्ती आणि त्या सत्पुरुषाने अक्कलकोटातील महापुरुषाचे केलेले वर्णन याचा तंतोतंत मेळ पाहून स्वप्न दृष्टांतातील मूर्ती निश्चितच अक्कलकोटात असेल याची मनोमन खात्री हैद्राबादच्या श्वेतकुष्ठ पिडीत लालासाहेबास पटली त्यामुळे त्यांनी सरळ अक्कलकोटचा रस्ता धरला कारण अक्कलकोटचे हे सत्पुरुषच आपले श्वेतकुष्ठ बरे करतील गंभीरपणे  या लीलाकथा भागाचा विचार केला तर कुणाही भक्तास श्री स्वामी समर्थांच्या महात्म्याची कल्पना येते पण सद्यःस्थितीत उपासना आणि योग्य ते वैद्यकीय उपचार करावयास हवेत.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या