मुंबईचे डॉ वामन गोपाळ प्रदोषकाळी श्री स्वामींच्या पूजेस बसले असता त्यास ध्यानांत असे दिसले की श्री स्वामी समर्थ महाराजांस एक म्हातारी विधवा बाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालीत आहे त्यांनी तीन दिवसांपूर्वी अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांकरिता मुंबईहून डाळिंब पाठविली होती तोच तर हा प्रसंग नसावा ना असे डॉक्टरांच्या मनात आल्यावर त्यांनी अक्कलकोटचे मामलेदार श्री बाबुराव मोघे यांना पत्र लिहिले मामलेदार मोघे यांचे पत्रास उत्तर आले त्यात ज्या दिवशी ज्या वेळेस डॉ वामनरावास दृष्टांत झाला (ध्यानात दिसले) त्याच वेळेस सुंदराबाई डाळिंबाचे दाणे श्री स्वामी समर्थांस खाऊ घालीत होती असे लिहिले होते .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांना भक्ताभिमानी भक्तवत्सल भक्तीप्रिय श्रीपती म्हणून ते संबोधले जाते त्यांचा पुरेपूर अर्थबोध करुन देणारी ही मनोज्ञ लीला आहे डॉ वामन गोपाळ हे त्यावेळचे मुंबईचे प्रख्यात डॉक्टर होते ते श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते या निस्सीम भक्तीपोटीच त्यांनी श्री स्वामी महाराजांस डाळिंबे पाठविली होती परंतु त्यांना हेही वाटत होते की महाराजांस डाळिंबे मिळाली असतील काय त्यांनी ती खाल्ली असतील काय त्यांना आवडली असतील काय इ परंतु त्यांच्या नित्याच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेस प्रदोषकाळी ध्यान लावून डॉक्टर बसले असता श्री स्वामींनी डॉक्टरांस आपण डाळिंब खात असल्याचे दाखवून त्यांच्या निस्सीम भक्तीची एक प्रकारे पोचपावतीच दिली यावरुन श्री स्वामी समर्थ भक्तांच्या भक्तीची कशी दाद देत आसत हेच स्पष्ट होते अशा दाद देणाऱ्या घटना श्री स्वामी समर्थांबाबत सद्यःस्थितीतही घडत असल्याचे सांगणारे असंख्य श्री स्वामी समर्थ उपासक आहेत .
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या