सुभेदार हडकणकर कुटुंबियांसमवेत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला येत असता मधे वाटेत पंढरपुरात त्यास हगवणीचा आजार झाला दिवसातून वीस पंचवीस वेळा आणि रात्रीतून दहा पंधरा वेळा त्यांना शौचास जावे लागे आठ दिवसात त्यांच्या जवळची खर्ची (पैसे ) संपत आली तेव्हा घरी परतावे असे त्यांनी ठरविले सुभेदारबाबांचा मुलगा रामचंद्रराव घाग ही सर्व परिस्थिती पाहून घाबरला गोपाळबुवा केळकरांजवळ येऊन तो रडू लागला बुवांनी त्यास रडण्याचे कारण विचारल्यावर तो सांगू लागला वडिलांची (सुभेदार बाबांची) प्रकृती सुधाण्या ऐवजी दिवसेंदिवस जास्तच बिघडत चालली आहे मी आजारी आई आजारी वडील तर आजारी आहेतच आम्ही सर्वच आजारी मी मोठ्या संकटात सापडलो आहे यावर उपाय सांगा त्यावर गोपाळबुवा केळकर म्हणाले मी तरी बाबा काय करु परंतु एक उपाय आहे तो करुन पाहवा महाराज जर कृपा करतील तर बरे होईल गोपाळबुवा आणि त्याने श्री स्वामी समर्थांकडे येऊन प्रार्थना केली की आम्ही इतक्या लांब आलो श्री स्वामी महाराजांनी आम्हास दर्शन देऊन कृतार्थ केले आता आम्ही आपली परवानगी घेऊन चिपळूणला परत जाणार आहोत परंतु मध्येच हे विघ्न उत्पन्न झाले तर आमची प्रार्थना इतकीच आहे की आमचे प्रारब्ध जसे असेल तसे आम्ही भोगावयास तयार आहोत त्याबद्दल आपणावर संकट घालीत नाही परंतु महाराजांनी अशी काही तोड काढावी की जेणेकरुन आम्ही घरी सुखरूप पोहचू घरी गेल्यावर काही का होईना अशी प्रार्थना करताच श्री स्वामी महाराज म्हणाले घरकू जाव त्या दोघांनी बरोबर आणलेली सुंठ साखरेची वाटी श्री स्वामी समर्थांच्या पायाला लावून प्रसाद म्हणून ती सुंठसाखर सुभेदार बाबास खाण्यास दिली श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन बैलगाडीने ती सर्व मंडळी परतीच्या प्रवासास घराकडे चिपळूणला निघाली सुभेदार बाबा जेव्हा बैलगाडीत बसलेले असत तेव्हा त्यांना बरे वाटायचे आणि बैलगाड्या थांबल्या व ते खाली उतरले की त्यांना शौचास होई असे चिपळूणला येईपर्यंत होत राहिले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या कथेत गोपाळबुवा सुभेदारबाबा त्यांचा मुलगा रामचंद्रराव ही प्रमुख पात्रे आहेत तेव्हा वाहतुकीच्या साधनांअभावी बैलगाडीनेच प्रवास करावा लागे या लीलाकथेत सुभेदार बाबास हगवणीचा अतिशय त्रास होत होता त्यामुळे कुटुंबियांनाही त्रास पैशाची चणचण आदींमुळे माघारी चिपळूणला परतण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत गोपाळबुवांनी श्री स्वामी समर्थांना यावर उपाय विचारण्यास सुचविले त्याप्रमाणे बुवा आणि रामचंद्रराव यांनी सुंठसाखरेची वाटी बरोबर घेऊन येणे श्री स्वामींचे दर्शन घेणे या गोष्टी घडल्या पण या लीलेत रामचंद्ररावांनी श्री स्वामी चरणी केलेली प्रार्थना आम्ही इतक्या लांब आलो श्री स्वामी महाराजांनी आम्हास दर्शन देऊन कृतार्थ केले आता आम्ही आपली परवानगी घेऊन चिपळूणला परत जाणार आहोत परंतु मध्येच हे विघ्न उत्पन्न झाले तर आमची प्रार्थना इतकीच आहे की आमचे प्रारब्ध जसे असेल तसे आम्ही भोगावयास तयार आहोत त्याबद्दल आपणावर संकट घालीत नाही परंतु महाराजांनी अशी काही तोड काढावी की जेणेकरुन आम्ही घरी सुखरूप पोहचू घरी गेल्यावर काही का होईना या त्यांच्या मनोगताचे प्रत्येकाने शब्दश विचार चिंतन मनन करावे या उदगारात अहंपणाचा दर्प आहे एक प्रकारचा सुप्त आदेशही आहे परमेश्वर चरणी असा भाव चालत नाही तो प्रयत्नपूर्वक टाळावा दर्शन दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थांप्रती रामचंद्ररावांनी कृतज्ञता व्यक्त केली ही एक चांगली बाब आहे आमचे प्रारब्ध जसे असेल तसे आम्ही भोगावयास तयार आहोत त्याबद्दल आपणावर संकट घालीत नाही परंतु महाराजांनी अशी काही तोड काढावी की जेणेकरुन आम्ही घरी सुखरूप पोहचू घरी गेल्यावर काही का होईना प्रार्थनेतील त्याचा हा भक्ती भाव शब्दरचना आपणा वाचकास कशी वाटया मनोगतातूनही आपणास बरेच काही शिकता येईल सुंठसाखरेची वाटी घेऊन तो श्री स्वामी समर्थांपुढे गेला ती त्यांच्या पायाला लावून ती सुंठसाखर प्रसाद म्हणून घेतली श्री स्वामी महाराज काय प्रसाद देतील याचीही वाट बघण्या इतपत त्याला धीर नव्हता घरी परत जाऊ का अशी घायकुताला येऊन त्याने त्यांची आज्ञा मागितली व तो पुढे म्हणतो जो त्रास आहे तो आमच्या प्रारब्धानुसार आम्ही भोगू फक्त घरी सुखरूप जाता यावे घरी गेल्यावर काय व्हायचे ते होवो वास्तविक त्याच्या समोर श्री स्वामी समर्थांच्या रुपाने साक्षात परमेश्वर असूनही त्याचा त्यांच्यावर पूर्णतः भरोसा नव्हता बर्याचदा ज्याची मुळीच शाश्वती नसते अशा घरादारावर आणि पैशा अडक्यावर अथवा अन्य प्रापंचिक वस्तूंवर त्याचा काय आणि आपला काय भरवसा असतो प्रारब्धात जे असेल ते भोगण्याची फक्त घरी पोहचण्याचीच इच्छा असलेल्या अशा रामचंद्रासारख्या प्रापंचिकास श्री स्वामी महाराज कशाला अडवतील घरकु जाव असे म्हणून पुन्हा त्याची प्रापंचिकाकडे रवानगी केली परमेश्वर कधीच जबरदस्ती करीत नाही त्यामुळेच परमेश्वराशी मूक अथवा उघड संभाषण आणि वर्तन विवेकशील असावे हा इथला महत्त्वाचा अर्थबोध.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या