आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे दोन तीन वेळा अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ दर्शनास आले होते त्यांनी त्यांच्या मनातील हेतू श्री स्वामींस गुप्त रितीने दाखवला होता (इंग्रजाविरुद्ध लढण्यास श्री स्वामींचे आशीर्वाद मिळावेत म्हणून ) परंतु श्री स्वामींनी त्यांना आज्ञा दिली नाही एकदा त्यांनी श्री स्वामींसमोर तलवार ठेवून मनात संकल्प केला की महाराजांनी ही तलवार माझ्या हातात दिली तर सर्वत्र आपला जय होईल परंतु श्री स्वामींनी ती तलवार एका सेवेकर्यांकरवी तरवडाच्या झाडावर ठेवली वासुदेवराव निराशेने तलवार घेऊन निघून गेले पुढे त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळाले नाही हे सर्वश्रत आहे.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इंग्रजांविरुद्ध द्वेष चीड सर्वांनाच माहित आहे इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी त्यांनी सहकार्यांसह बंड करण्याचे ठरविले होते त्यांच्या या कार्यात त्यांना तेव्हा अक्कलकोटात असलेल्या अवतारी सदगुरु श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद हवे होते म्हणून त्यांनी श्री स्वामी समर्थांपुढे तलवार ठेवली परंतु श्री स्वामी समर्थ हे त्रिकालज्ञानी भूत वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेणारे ईश्वरी अवतार इ.स.१८५७ च्या स्वतंत्र संग्रामाची अंतिमत काय परिणती होणार हे त्यांनी अगोदरच ओळखले होते ते सूचित करण्यासाठी त्यांनी सेवेकर्यांकरवी तलवार तरवडाच्या झाडावर ठेवली या कृतीतून अभी वखत नही असे सूचित केले कोणत्याही शुभ कार्यास सदगुरुचे आशीर्वाद मिळणे आवश्यक आहे तसे मिळाले ना तर आता ही योग्य वेळ नाही असा संकेत समजून धीर संयम राखण्याची गरज असते सुचिन्ह आणि दुःचिन्ह ओळखण्याचे सामर्थ्य श्री स्वामी समर्थ चाकरीत निश्चितच प्राप्त होते क्रोधाने अविवेकाने अशुभ संकेत मिळत असताना महत्त्वाच्या कृती करु नयेत कारण क्रोधामुळे मनावरचा ताबा नाहीसा होतो त्यातून सर्वनाश ओढवतो अशीच काहीशी स्थिती वासुदेव बळवंत फडके यांची झाली होती ते तलवार घेऊनच आले होते याचा अर्थ त्यांचा क्रांतीचा निर्णय अगोदरच झाला होता मी निर्णय घेतला आहे तुम्ही म्हणजे श्री स्वामी समर्थांनी अनुमती द्यावीच हा त्याचा मनोमन आग्रह होता नव्हे तो दुराग्रहच होता परमेश्वरासमोर असा दुराग्रही हट्ट चालत नाही कदाचित श्री स्वामींपुढे त्यांनी मनात असलेली योजना सविस्तर सुरुवातीलाच प्रांजळपणे मांडून त्यांचे आशीर्वाद मागितले असते तर कदाचित त्यांना काही काही सूचना मिळाल्या असत्या श्री स्वामी समर्थांपुढे प्रांजळपणे वस्तुस्थिती मांडून आशीर्वाद घेण्यात काय गैर आहे पण आपणसुध्दा तसे करतो का क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची लीला आपल्या सर्वांनाच अविवेकी उताविळी न करण्याचा सर्व काही मनोभावे देवापुढे प्रांजळपणे मांडण्यास प्रबोधित करते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या