अक्कलकोटात कोंडूनाना म्हणून श्री स्वामी समर्थांचा भक्त होता एके दिवशी तो खासबागेतील विहिरीत तोंड धुवीत असता ब्रिटिश पोलिटिकल एजंट बंबगार्डनर तेथे आला कोंडूनानाने विहिरीचे पाणी खराब केले म्हणून त्यास शिव्या दिल्या आणि दोन तीन बुटांच्या लाथा बंबगार्डनरने मारल्या ही तक्रार कोंडूनानाने श्री स्वामी समर्थांकडे केली श्री स्वामींनी कोंडूनानाचे सर्व ऐकून घेतले पण त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत थोड्याच दिवसांत बंबगार्डनरने ज्या पायाने स्वामीभक्त कोंडूनानांना लाथा मारल्या त्या पायास इजा झाली जवळ जवळ तो पाय कामातूनच गेला पुष्कळ डॉक्टरी उपाय केले पण गुण येईना पाय कापल्याशिवाय बरा होणार नाही असे सांगण्यात आले मोरोकाशी मामलेदारांमार्फत श्री स्वामींकडे पायाबाबत प्रार्थना करण्यात आली तेव्हा श्री स्वामी म्हणाले हात तेरे माकू गध्धे हमकू क्या पूछता है श्री स्वामींचा हा राग बंबगार्डनरला समजला तो विचारात पडला त्यास काय करावे काही कळेना एक दिवस श्री स्वामी फिरत फिरत बंबगार्डनरच्या बंगल्यात गेले श्री स्वामींना पाहाताच बंबगार्डनर उठून अदबीने उभा राहिला श्री स्वामी समर्थांना सलाम करुन बसावयास खुर्ची दिली त्याने श्री स्वामींस सहज विचारले महाराज कोठे जाता ते ऐकून तुझ्या बायकोला आलो हे ऐकून त्यास मोठे वाईट वाटले नंतर श्री स्वामी त्यास दरडावून म्हणाले भोसडीच्या आम्हाला लाथा मारल्यास आणि वर औषध विचारतोस हे ऐकताच कोंडूनानास खासबागेत लाथा मारल्याचे त्याला आठवले त्याने त्यांच्या पायावर मस्तक ठेवून विनयाने प्रार्थना केली महाराज अपराधाची क्षमा करुन मला काही औषध द्या मी फार दुःख सहन केले त्याला पश्चात्ताप झालेला पाहून दयाघन श्री स्वामींनी त्यास औषध सांगितले त्यांनी सांगितलेला औषधोपचार करताच बंबगार्डनर साहेबांचा पाय आठ दिवसात बरा झाला 


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

ह्या लीलाकथेतील बंबगार्डनरसारख्या हातात सत्ता संपत्ती आली किंवा असली तरी माणसाने मर्गूरीने उद्दामपणे व तुच्छतेने इतरांशी वागू नये निदान कोंडूनानांसारख्या साध्या सरळ भोळ्या भाबड्या असलेल्या समाजातील गरीब व्यक्तीशी असे वर्तन मुळीच करु नये तसे केल्यास केव्हा ना केव्हा तरी त्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शासन होते अथवा प्रायश्चित भोगावे लागते हे लक्षात असू द्यावे हा या कथेचा अर्थबोध आहे कोंडूनाना हा स्वामीभक्त होता निरपराध भक्तांचे रक्षण परमेश्वर हा करतोच करतो हा विश्वासही ह्या लीलेतून दृढ होतो श्री स्वामी समर्थ हे तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आत्मबल वाढविणारे अभिवचन देणारे सदगुरु आहेत याचीही प्रचिती येते 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या