श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आल्यापासून चोळाप्पा त्यांची एकनिष्ठपणे सेवा करीत असे चोळाप्पास द्रव्य लोभ सुटला आणि त्याचे श्री स्वामी सेवेत अंतर पडू लागले एकदा श्री स्वामी समर्थांनी एक विलक्षण लीला चोळाप्पाच्याबाबत केली त्यांनी जवळ पडलेले फडके उचलून त्याची टोके एकत्र बांधून एक झोळी तयार केली व सर्वांपुढे धरुन अल्लख असे म्हणाले त्याबरोबर कोणी एक कोणी दोन कोणी पाच रुपये त्या झोळीत टाकले पाहता पाहता एकूण भिक्षा एकशे पंचवीस रुपये जमली ती झोळी चोळप्पाचे स्वाधीन करुन श्री स्वामी समर्थ त्यास म्हणाले चोळ्या तुझे ऋण फिटले बरे चोळप्पा श्री स्वामींच्या सेवेत आल्यापासून त्यास सुमारे साठ पासष्ठ हजार रुपये काही रोख काही जिन्नस इतके द्रव्य मिळाले त्यात १२५ रुपये कमी असावेत म्हणून की काय श्री स्वामी समर्थांनी स्वहस्ते झोळी पसरुन १२५ रुपये जमा करुन चोळाप्पाचे स्वाधीन केले थोड्याच दिवसात सरकारातून एक कारकून तीन शिपाई नेमून जे उत्पन्न होईल ते पंचांनी पाहवे आणि त्याचा योग्य तो खर्च करावा असे फर्मान निघाले त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थांपुढे येणाऱ्या उत्पन्नावरील चोळप्पा व सुंदराबाईचा हक्क उडाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

अक्कलकोटात प्रथम प्रवेश करते वेळीच श्री स्वामी समर्थ चोळप्पाला म्हणाले होते अरे चोळ्या तुझे देणे देण्यासाठी मी आलो आहे पूर्वीचा अक्षय वटवृक्षाखालचा विहार विसरलास काय श्री स्वामींच्या या बोलण्यातच या लीला कथेचा बोध आणि संकेत दडलेला आहे वास्तविक श्री स्वामी समर्थांसारख्या प्रत्यक्ष परब्रह्याच्या निकट सहवासाशिवाय अन्य दुसऱ्या गोष्टीची गरज अथवा इच्छा चोळप्पास असावयास नको होती पण त्याचे मन तुमच्या आमच्या सारख्या एका प्रापंचिकाचे एका संसारी गृहस्थाचे कुटुंवत्सल व्यक्तीचे होते म्हणून त्याला द्रव्यलोभ सुटला या द्रव्यलोभानेच त्याचा श्री स्वामींपुढे येणाऱ्या उत्पन्नावरील हक्क उडाला वास्तविक श्री स्वामी कृपेने त्यांच्या निकट सहवासाने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने चोळप्पामध्ये निरीच्छ निर्लोभी वृत्ती निर्माण होण्याऐवजी द्रव्यलोभ निर्माण झाला हे त्याचे पूर्वसंचित अविवेक आणि षडरिपूंच्या चिखलात रुतलेले मनच म्हणावे लागेल सध्याच्या अध्यात्माच्या उत्सवी वातावरणात असे अनेक लोक आढळतात हा कसला आणि कोणाचा पराभव म्हणायचा श्री स्वामी समर्थांनी चोळप्पाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेली कृती या लीलाकथेत आलेली आहे चोळप्पाचे श्री स्वामींना तसे करु द्यावयास नको होते सदैव त्यांच्याच ऋणात राहवयास हवे होते परंतु त्याच्या पूर्वसंस्करांनी मात केली परिणामी सरकारातून नेमणूक होऊन त्याला त्याचा हक्क गमवावा लागला श्री स्वामी समर्थ चरण हीच सर्वश्रेष्ठ धन दौलत मिळकत त्यांची कृपा हाच आपल्या चिरंतन आनंदाचा आणि सुखाचा ठेवा समजावयास हवा पण तसे घडले नाही यातून आता कसे बोधित व्हायचे ते ज्याच्या त्याच्या मनावर आणि वृत्तीवर अवलंबून आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या