गारोडे गावचे सीतारामपंत नेने कट्टर रामभक्त होते प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार व्हावा म्हणून ते कडक राम उपासना करीत होते श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने मला आज राम भेटला असे त्यांना वाटले माधुकरी मागून श्री स्वामी समर्थांची सेवा करीत ते तेथेच राहिले नित्य माधुकरीवर गुजराण करीत श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर राम उपासनेची माळ घेऊन ते जप करीत असत त्यांनी ही इतकी कठोर जपसाधना सुरू केली होती की कुणाशीही त्यांनी भाषण वर्ज्य केले होते असे राम उपासनेत काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी दोन प्रहरी सीतारामपंतासं श्री स्वामी समर्थांनी रामरुपात दर्शन देऊन सीताराम पंतांच्या ज्या काही शंका होत्या त्या सर्वांचे निराकरण निवारण केले त्यामुळे त्यांचे समाधान झाले ते जागृत झाल्यावर जसा कोणी प्रत्यक्ष सांगून जातो आणि त्याचे स्मरण राहते त्याप्रमाणे सीतारामपंतांना स्वप्नात श्री स्वामी महाराजांनी दिलेल्या बोधाचे पूर्णपणे स्मरण राहिले नंतर ते काही दिवस अक्कलकोटी राहून श्री स्वामी समर्थांचा जय जयजयकार करीत त्यांच्या गावी निघून गेले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलाकथेतील सीतारामपंत नेने हे प्रखर रामभक्त आहेत राम हेच त्यांचे कुलदैवत आराध्य आणि उपास्य दैवत होते राम हेच त्यांचे सर्वस्व होते त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार व्हावा त्यांचे दर्शन व्हावे आशी प्रचंड तळमळ त्यांच्या मनाला लागणे साहजिक आहे त्यासाठीच सीतारामपंत नेने श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला श्री श्री स्वामींच्या दर्शनाला आले श्री स्वामींचे दर्शन घेताच त्यांना आज मला राम भेटला असे तीव्रतेने जाणवले सीतारामपंतांनी माधुकरी मागून श्री स्वामी समर्थांपुढे नित्य बसून रामनाम घेण्याचा दिनक्रम सुरू ठेवला रामनाम जप उपासनेत व्यत्यय नको म्हणून त्यांनी मौनव्रत स्वीकारले जणूकाही स्वामीराय हाच माझा रामराय अशा दृढ भावनेने त्यांची उपासना सुरू असतानाच श्री स्वामी समर्थांनी सीतारामपंतास प्रभू रामरुपात दर्शन देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले असा बावरा होऊ नकोस मीच राम आहे राम आणि मी एकच आहे असा बोध सीतारामपंतांना प्रभू रामचंद्रांच्या रुपात दर्शन देऊन करून दिला या कथेतून श्री स्वामी समर्थ हेच रामस्वरुपी आहेत याचा बोध होतो परमेश्वराची असंख्य सगुण रुपे आहेत आपल्याला जे भावेल समजेल उमजेल मानवेल ते परमेश्वर स्वरुप स्वीकारावे हा देव तो देव असे देव देव करीत चंचल वृत्तीने भटकण्यात वेळ श्रम पैसा शक्ती आदीचा अपव्यय करु नये जे उपास्य दैवत स्वीकारायचे ते काळजीपूर्वक विवेकाने बुद्धी प्रामाण्याने स्वीकारावे एकदा स्वीकारल्यावर तेच सर्वत्र अत्रतत्र पाहवे त्याच दैवताच्या उपासनेचा ध्यास असू द्यावा त्याचेच नाम घ्यावे मनन चिंतन करावे कारण देवाची सगुण रुपे अनेक असली तरी निर्गुण निराकार एकच रुप आहे म्हणून खर्या उपासकाच्या साधकाच्या भक्तांच्या सेवेकर्याच्या मनात देवाविषयी द्वैत्व भाव नसावा भेदा भेद भ्रम अमंगळ मानून सर्वांचाच देव दया क्षमा शांती आणि करुणा या दैवी गुणातच आहे असे मानावे ती खरी धार्मिकता ती खरी उपासना याचा अर्थ इतर देव देवतांना धर्म पंथाचा तिरस्कार करावा आसा नव्हे त्यांच्या देव देवतात आपले उपास्य दैवत पाहवे आपल्या उपास्य दैवता इतकाच इतर देव देवतांना मान सन्मान द्यावा त्यांना नमस्कार करताना आपण आपल्याच उपास्य दैवतास नमस्कार करतोय असे मानावे देव देवतांमधला मनातील द्वैत भाव काढावा त्यांची सगुण स्वरुपे भिन्न असली तरी त्यांची निर्गुण स्वरुपे एकच आहेत.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या