श्री स्वामींनी त्या ब्राम्हण पती पत्नीस त्या पिशाच्याच्या देहाचे (मृत मुलाचे) दहन करण्यास सांगितले परंतु त्या पिशाच्याचा मृतदेह अक्राळविक्राळ होता म्हणून तेथे जमलेले लोक म्हणू लागले की महाराज हे प्रेत आम्हास कसे उचलवेल त्यावर श्री स्वामी म्हणाले प्रेतास भस्म लावा म्हणजे शरीर पूर्ववत होईल तसे करताच शरीर  पूर्ववत झाले दहनविधी आटोपून तो ब्राम्हण श्री स्वामी समर्थांजवळ येऊन हात जोडून प्रार्थना करु लागला की महाराज माझे वय साठ वर्षांहून आधिक झाले आहे मी निपुत्रिक आहे हे लांछन दूर करा अशी प्रार्थना करीतच त्याने श्री स्वामींचे पाय घट्ट धरले दयाघन श्री स्वामी समर्थांना त्या ब्राम्हणाची दया येऊन ते त्यास म्हणाले जा होईल मुलगा पुढे श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाप्रमाणे एक वर्षाचे आत त्यास मुलगा झाला नंतर ते दोघे उभयता श्री स्वामी समर्थांची भक्ती करीत राहिले 


अर्थ / भावार्थ / मथितार्थ

श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे त्या मृत पिशाच्याच्या देहाचे दहन करणे क्रमप्राप्त होते परंतु तो देह दहा हात  लांबीचा अक्राळविक्राळ होता तो कसा उचलावा हा सर्वांपुढे प्रश्न पडला श्री स्वामींच्या सांगण्यावरून त्या प्रेतास भस्म लावताच ते मृत शरीर पूर्ववत मुलाच्या शरीरासारखे झाले नंतर तेथील सर्वांनी त्या मृतशरीराचा दहनविधी उरकला हे सर्व होऊनही साठ वर्षांचे वय असलेल्या त्या ब्राम्हणाची लालसा वासना मृतवत झाली नव्हती त्याला मुलगा हवा होता म्हणून त्याने श्री स्वामींकडे निपुत्रिक असल्याचे सांगितले व हे लांछन घालविण्याची म्हणजे पुत्र प्राप्तीची प्रार्थना केली श्री स्वामींनी यावेळी जा होईल मुलगा असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे एका वर्षाचे आत त्यास मुलगा झाला मानवाच्या इच्छेस अंत नसतो तो मागतच असतो हे येथे साठ वर्षे वयाच्या त्या ब्राम्हणाच्या इच्छेवरुन बोधित होते  मा.श्री नागेश करंबेळकर यांनी परम,अर्थाचे ३६५ दिवस या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी पुढील गोष्टी या लीलेत साधल्या १ समंधाला म्हणजे त्या पिशाच्याला मुक्ती दिली २ निष्ठावानपणे भक्ती करणाऱ्या ब्राम्हणाचा प्रारब्धभोग बदलला ३ रामेश्वर मंदिरात व बाहेर एकाच वेळी बहुरुप सिध्दीने त्या ब्राम्हणास दर्शन दिले रामेश्वर व आपण एकच आहोत हे मंदिरातील पिंडीच्या जागी स्वतःचे स्वरूप दाखवून सिद्ध केले ४ भस्म महिमा वर्णन केला ५ ब्राम्हण सुरुवातीपासूनच श्री स्वामी समर्थांची सेवा करीत होता त्यांना नित्यनेमाने नैवेद्य अर्पण करीत होता त्याच्या सेवेच फळ त्याच्या पदरात टाकले ६ योग सामर्थ्याने पुनश्च त्या ब्राम्हणास त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी पुत्र लाभ घडविला

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या