मोगलाईत काजळे गावी गोविंद मोहिते यास श्री स्वामी समर्थ कृपेने पुत्रसंतान झाले एके दिवशी त्याने अक्कलकोटी येऊन श्री स्वामींजवळ प्रार्थना केली की महाराज प्रपंच फार वाढला आणि उत्पन्न कमी अशा स्थितीत अब्रने दिवस कसे निघतील याची फार काळजी वाटते काय करावे हे ऐकून श्री स्वामी म्हणाले तुमचे शेतात विहिर खणावी ऊस हळद लावावी त्यावर गोविंदराव म्हणाले पुष्कळ विहिरी खणल्या परंतु पाणी लागत नाही समर्थ म्हणाले औदुंबर पिंपरी पिंपळ यांच्या मध्यभागी खणावे म्हणजे पाणी मिळेल अशी श्रीची आज्ञा होताच गोविंदरावाने शेतात विहिर खणून पाहिली परंतु पाणी लागले नाही शेवटी निराश होऊन तो अक्कलकोटी आला आणि श्री स्वामींस सांगू लागला की महाराज आज्ञेप्रमाणे विहिर खणून पाहिली परंतु पाणी मिळाले नाही समर्थ म्हणाले अरे काळ्या हत्तीचे डोके फोडल्यावर धो धो पाणी वाहील त्याला श्री स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ न कळल्याने श्रीपाद भटाने त्यास सांगितले अहो औदुंबराशेजारी हत्तीसारखा दगड आहे तो फोडल्यावर पाणी लागेल असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे गोविंदराव श्री स्वामींची आज्ञा घेऊन मोठया आनंदाने घरी आला तेथे असलेला मोठा दगड फोडताच हत्तीच्या सोंडेसारखा झरा त्यातून वाहू लागला शेती चांगली पिकू लागली त्याची प्रपंचाची काळजी दूर झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

काजळे गावच्या गोविंदराव मोहित्यांना श्री स्वामी समर्थ कृपेनेच पुत्र संतान झाल्यामुळे त्यांची श्री स्वामींवरील श्रद्धा दृढ झाली होती पण घर प्रपंचात गुरफटलेल्या गोविंदरावांच्या अजूनही काही समस्या होत्याच प्रपंचात गुरफटलेल्यांच्या समस्या सहसा संपतच नसतात म्हणून एकमेव आधार असलेल्या श्री स्वामींस त्याने वाढता प्रपंच कमी उत्पन्न अशा स्थितीत अब्रने जगण्यासाठी काय करावे म्हणून विचारताच श्री स्वामींनी त्यास विहिर खोदावयास सांगून शेतात ऊस हळद लावण्यास सांगितले त्याने पुष्कळ विहिरी खोदल्या पण पाणी नाही असे हताशपणे श्री स्वामींस सांगताच श्री स्वामींनी त्यास हत्तीसारखा दगड फोडण्यास सांगितले त्याने तसे करताच पाण्याचा धो धो झरा विहिरीस लागला त्यामुळे त्याची शेतीही चांगली पिकू लागली त्याची प्रपंचाबद्दलची काळजी दूर झाली श्री स्वामी समर्थांचे नाव ऐकून अनेकजण प्रापंचिक अडीअडचणी घेऊन श्री स्वामींकडे येत आणि ते ही अनेकांच्या अडीअडचणी दूर करीत ही लीला प्रतिकात्मक अंगाने विचारात घेतल्यास अनेक बाबींचा उलगडा होतो गोविंदराव मोहिते पारमार्थिक अर्थाने एक प्रापंचिक जीव सदगुरु कृपेने त्यास पुत्र झाला म्हणजे त्यास विवेक आला त्याच्या प्रतिकूल प्रारब्धाने त्यांच्या संसारात अनेक अडचणी आल्याने तो काळजीत पडला पण गुरुविण कोण दाखविल वाट या श्रद्धेने तो श्री स्वामी चरणी लीन झाला गुरुआज्ञेचे पालन केले सुरुवातीस विहिरी खोदूनही पाणी लागले नाही पण त्याची निष्ठा अविचल राहिली गुरुवरील निष्ठा वाया जाणार नाही याचा त्याला पक्का विश्वास होता जन्मोजन्मीचे प्रारब्ध संचित साचून तोच काळा हत्तीसारखा खडक बनला हा खडक नामस्मरण जपजाप्य आदि उपासनेच्या सुरुंगाने फुटून त्यातून गुरुकृपेचा धोधो झरा वाहाणारच.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या