आळंदीस नृसिंहसरस्वती म्हणून प्रख्यात साधू होते त्यांचा योग क्रियेचा चांगला अभ्यास होता परंतु त्यांना समाधी लागेना यासाठी गुरू मिळावा म्हणून ते पुष्कळ फिरले पण त्यांना योग्य गुरू भेटला नाही अखेरीस श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले ते येण्याआधीच श्री स्वामींनी त्यांची योग्यता आणि विव्दत्ता अंतर्ज्ञानाने जाणून सेवेकर्यांकरवी नृसिंहसरस्वतींसाठी मृगाजिनाचे आसन घालून घेतले आळंदीकर नृसिंहसरस्वतींनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताच त्यांना समाधी लागली काही वेळाने देहभानावर आल्यानंतर ते श्री स्वामींची स्तुती करीत म्हणाले महाराज मी पुष्कळ फिरलो परंतु ज्या तत्वाचा शोध लागेना त्या तत्वाचे ज्ञान एका क्षणात आपल्या कृपादृष्टीने झाले धन्य आहे या गुरुत्वाची केलेल्या श्रमाचे व जन्माचे आज सार्थक झाले मी कृतार्थ झालो पुन्हा काही दिवसांनंतर ते श्री स्वामींच्या दर्शनास आले त्यांना पाहताच श्री स्वामी म्हणाले क्यों रंडी अभी छोडी नही हे ऐकताच नृसिंहसरस्वती हात जोडून म्हणाले महाराज रंडी छोडनेके वास्ते येही इलाज है आपकी कृपा होना श्री स्वामींनी त्यांच्या गळ्यातील हार आळंदीकर स्वामींच्या गळ्यात घालून त्यांच्यावर कृपानुग्रह केला तेथील सेवेकर्यांना रंडी सोडण्याचा अर्थ काही लक्षात आला नाही त्यावर श्री स्वामी म्हणाले अहो रंडी म्हणजे सिध्दी सोडण्यास श्री स्वामी समर्थ सांगत आहेत काही दिवस आळंदीकर स्वामी अक्कलकोटात राहून श्री स्वामींची आज्ञा घेऊन आळंदीस परत आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

आळंदीकर नृसिंहस्वामी उच्च दर्जाचे योगी होते गुरुच्या शोधार्थ ते खूप भटकले शेवटी त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडून अनुग्रह मिळाला त्यांच्या शंकांचे निरसन झाले यावरुन श्री स्वामींची योग्यता वादातीत आहे हे स्पष्टच होते परंतु आळंदीचे नृसिंहस्वामीही श्रेष्ठच होते त्यांचा सन्मान राखण्यासाठी श्री स्वामींनी सेवेकर्यांस मृगाजिनाचे आसन घालावयास सांगितले रिध्दी सिध्दी घातक आत्मनाश करणाऱ्याही असतात म्हणूनच श्री स्वामींनी रिध्दी सिध्दीला उद्देशून रंडी म्हटले आहे रंडीवरुन कुणासही त्यांच्या विनाशकारी मायावीपणाची कल्पना येते नृसिंहस्वामींना अष्टांगयोग साधना अवगत होती पण श्री स्वामींनी रिध्दी सिध्दीला उद्देशून रंडी शब्द नृसिंह स्वामींच्या लक्षात आणून दिला रंडी कशी असते हे येथे सांगण्याची गरज नाही यातून श्री स्वामी आशय आणि अर्थपूर्ण शब्द अचूक वापरीत समोरच्या विव्दानाची पारख करुन आदर करीत .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या