श्रीपाद भट नावाचे विद्वान दशग्रंथी ब्राम्हण फिरत फिरत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आले श्री स्वामींच्या सेवेस राहिले एके दिवशी महाराज श्रीपाद भटास म्हणाले अहो भटजी तुम्ही तीन महिने काशीस जाऊन राहा नंतर आम्हास येऊन भेटा श्री स्वामींच्या आज्ञेनुसार ते काशीस आले गंगा स्नान विश्वेश्वर दर्शन पूजन तीन महिने करीत राहिले ते स्वतःच मोठे विद्वान वैदिक असल्यामुळे रोज विद्वान शास्त्री पंडित यांच्या सभेत जाऊन बसण्याचा त्यांचा क्रम असे परंतु त्यांना तेथे कोणी मान सन्मान देत नसे आपल्याला येथे विचारतो कोण असे वैतागाने म्हणत ते विश्वेश्वराचे दर्शनास निघाले तेथे विश्वेश्वरासमोर कटीवर हात ठेवून श्री स्वामी समर्थ त्यांना दिसले त्यांना बघून सर्व लोक म्हणू लागले हे (श्री स्वामी समर्थ) सतेज पुरुष दिसतात तर हे कोणीतरी अवतारी असावेत तर कुणी म्हणू लागले की आम्ही यांस हंपीविरुपाक्षासी पाहिले कुणी म्हणू लागले हिमालयी पाहिले कोणी म्हणे जगन्नाथी पाहिले अशा प्रकारे लोक जमून श्री स्वामी समर्थांविषयी चर्चा करु लागले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला कथा भागातील श्रीपाद भट हे वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी ब्राम्हण होते परंतु प्रारब्धामुळे त्यांना यश कीर्ती मान सन्मान हुलकावण्या देत होता त्यामुळे ते काहीसे नाराज आणि हतबल झाले होते अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थांनी हे सर्व जाणले होते श्री स्वामींच्या सहवासात काही दिवस राहिल्यावर श्री स्वामी समर्थ कृपा श्रीपाद भटावर होण्याची वेळ आली श्री स्वामींनीच श्रीपाद भटाचे प्रारब्ध बदलण्यासाठी त्यास काशीस पाठविले तेथेही निराशा आणि हतबलतेने त्यांची पाठ सोडली नव्हती नको ती सन्मानाची कट कट असे म्हणून विश्वेश्वराच्या दर्शनास श्रीपाद भट निघाले असताना त्यांना श्री स्वामी महाराज श्रीपाद भटाची निष्ठा सेवा जोखून सांगत होते श्रीपाद भटा भिऊ नये आम्ही तुझ्या बरोबरच नव्हे तर जवळच आहोत एक प्रकारे श्री स्वामी समर्थांचे कृपाछत्रच त्यांना लाभले होते या लीलाकथेत लोकांनी श्री स्वामी समर्थांना वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्याचा उल्लेखही आलेला आहे श्री स्वामी समर्थांना २३ प्रकारच्या सिद्धी प्राप्तच नव्हे तर त्यांच्या दासी होत्या याचीही नोंद आपण घेतली पाहिजे उदा एक आणिमा या सिद्धीने कोठेही संचार करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले होते कामरुप अथवा बहुरुप या सिद्धाने अनेक रुपे त्यांना धारण करता येत होती सहक्रिडा या सिद्धीने कृष्ण विठ्ठल दत्त विश्वेश्वर कार्तिक आदि स्वरुपात दर्शन देता येत होते त्रिकालज्ञान या सिद्धीने भूत वर्तमान भविष्य यातील घटनांचे ज्ञान त्यांना अगदी सहज होत असे श्रीपाद भटाच्या बाबतीत त्याचे काय होईल हे श्री स्वामींना ज्ञात होते त्यासाठी काय योजना करावी हे ही माहित होते म्हणून त्यास काशीस पाठवले संक्षिप्त स्वरुपात सांगायचे झाले तर वरील सिद्धीच्या योगाने त्यांनी वे.शा.सं.दशग्रंथी श्रीपाद भटास सर्व काही मिळवून दिले ते कुणासही उणे अथवा वंचित ठेवित नसत हा बोध येथे व्हावा.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या