एका गळित कुष्ठरोग्याला पंढरीनाथांनी स्वप्नात सांगितले अक्कलकोटास जा म्हणजे आरोग्य होईल दोन दिवस हाच दृष्टांत झाल्यामुळे तो अक्कलकोटास आला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सेवेकरिता तेथेच राहिला श्री स्वामी समर्थांचे त्रिकाळदर्शन तीर्थप्रसाद मुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण अशी त्याची सेवा सुरू होती एके दिवशी एक ब्राम्हण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आला त्यांचे दर्शन घेऊन तो हात जोडून उभा राहिला तो महाराज त्यास म्हणाले अहो भटजीबुवा तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे त्याचे एक खोड आम्हास आणून द्या श्री स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या ब्राम्हणाने चंदनाचे खोड श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण केले ते खोड त्या कुष्ठपीडीतास देऊन श्री स्वामी म्हणाले उगाळून अंगास लावावे चंदनाचे खोड ज्यादिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग जाईल श्री स्वामींच्या आज्ञेनुसार ते खोड उगाळून तो अंगास लावू लागला तीन वर्षे ज्या दिवशी पूर्ण झाली त्याच दिवशी चंदनाचे खोड सरले आणि त्याचा कुष्ठरोगही बरा झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ह्या लीलाकथेत श्री स्वामी समर्थांनीच पंढरीनाथाच्या दोन दिवसाच्या दृष्टांताच्या निमित्ताने अक्कलकोटात आणले त्याच्या सेवेबद्दल या लीलेत उल्लेख आहे सेवा केली तरच मेवा या वचनानुसार श्री स्वामींनी एका ब्राम्हण भटजीकडून चंदनाचे खोड मागविले ते त्या कुष्ठरोगावर उगाळून लावण्यास सांगितले तीन वर्षे श्री स्वामी निर्देशित चंदनाचे खोड उगाळून उगाळून संपले आणि पंढरीनाथही कुष्ठरोग मुक्त झाला ते चंदनाचे झाड कुठे आहे हे श्री स्वामी अगदी सहज सांगतात हा त्यांच्या सर्वसाक्षीत्व सामर्थ्याचा बोध करुन देणारी घटना आहे भटजीकडचे चंदन एका शूद्र कुष्ठरोग्यास देणे या मागे श्री स्वामींचा काय बरं उद्देश असेल त्यांना इतर ठिकाणाहून चंदनाचे खोड नसते का मिळाले पण त्यांचा उद्देशच मुळी फार व्यापक होता ब्राम्हणाच्या परसातील चंदनाचे खोड त्याचा वापर पंढरीनाथासारख्या एका सर्वसामान्यास त्याचाही बोध आपण करुन घेतला पाहिजे चंदन हे स्वतः झिजून इतरांना सुगंधित करते परोपकाराचे प्रतीक म्हणून चंदनाचा उल्लेख केला जातो चंदनाचे लेपन म्हणजे निरपेक्ष आणि व्रतस्थ वृत्तीने परोपकार करीत राहणे आसक्तीचा कुष्ठरोग जडलेल्या आपल्या सारख्यांनी थोडे तरी इतरांसाठी झिजायला नको का थोडा फार परोपकार करायला नको का परोपकारी कृत्ये जितकी आपणाकडून होतील तितक्या लवकर आसक्ती लोभ माया ममता याचा कुष्ठरोग बरा होईल हा या कथेचा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या