गणेश हरि सोहनी मामलेदाराच्या घरी गणपती उत्सवाचे कीर्तन चालले होते मध्येरात्रीची वेळ होती श्री स्वामी समर्थ कीर्तन सभेतून उठून गणेश हरि सोहनीच्या घराबाहेर पडले सोहनीही श्री स्वामींच्या मागोमाग बाहेर आले श्री स्वामींना घरात येण्याविषयी विनवण्या करु लागले पण श्री स्वामी घरात परत न जाता श्री सोहनीस म्हणाले तुझे घरी आम्हास विटाळ होतो आम्ही येत नाही असे म्हणून त्यांनी जंगलाचा रस्ता धरला श्री सोहनी हे मशाल घेऊन श्री स्वामींच्या मागोमाग एक कोसभर गेले श्री स्वामींना माघारी घरी परतण्याबद्दल ते पुन्हा पुन्हा विनवीत होते पण श्री स्वामी समर्थ काही सोहनींबरोबर परत आले नाहीत अखेरीस निराश होऊन सोहनींनी श्री स्वामींस प्रश्न केला पुन्हा केव्हा दर्शन द्याल त्यावर श्री स्वामींनी उत्तर दिले अंब्याचे दिवसांत येऊ 


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

श्री स्वामींनी सोहनु यांस तुझे घरी आम्हास विटाळ होतो असे सांगितले कारण सोहनी यांनी त्यावेळी त्यांच्या घरात एक रखेल बाळगली होती त्या बाईला सोडून द्यावी अशी श्री स्वामींची इच्छा होती सोहनी हे भक्तीमान असूनही कामवासनेच्या मायेचे गारुड त्यांच्यावर बसले होते प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामींना सोडून त्या रखेलीच्या चैनबाजीत सोहनी मश्गुल झाल्यामुळे त्यांच्यावर बरेच अनिष्ट प्रसंगही गुदरले हे अनिष्ट प्रसंग त्या बाईला सोडेपर्यंत त्यांच्यावर गुदरतच राहिले त्यांच्यावर फौजदारी खटले झाले ते सेशन कमिट झाले पण श्री स्वामी कृपेमुळे ते त्या सर्वांतून निर्दोष सुटले पुढे त्या बाईला सोडल्यावर श्री स्वामींच्याच कृपेने सोहनी यांना बडोद्यास (गुजरात ) पुन्हा मामलतीच्या जागी नोकरी मिळाली प्रत्येकाने नीतीमान भक्तीमान आणि शीलवान असावे छंदी फंदी व्याभिचारी असू नये अशी श्री स्वामींची सक्त ताकीद होती कारण विषयवासनेच्या मोहाला बळी पडून अथवा षडरिपूने लिप्त झाल्यास भगवंताशी अनुसंधान साधण्यात एकाग्रता निर्माण होत नाही आता आपण या श्री स्वामीलीलेतून काय बोध घेणार याचेच खरे तर आपण आत्मचिंतन करुन स्वतःचा आचार विचार सुधारावयाचा आहे सोहनीसारखे वागायचे टाळायचे आहे मुण्डकोपनिषदातील जायमात्मा बलहीनेत लभ्यते असे आहे त्याची आठवण होते माणसाने वीर्यवान बलवान शीलवान असलेच पाहिजे यावर श्री स्वामींचा कटाक्ष होता 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या