दुसऱ्या दिवसापासून बुवास श्री स्वामींचे दर्शन बंद झाले ज्या ज्या वेळी बुवा श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येत त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ तोंडावर पांघरूण घेऊन निजलेले असत (तसं ते दाखवित) असे बरेच दिवस गेले दर्शनासाठी कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा बुवा येत सहा सहा घटका प्रहर प्रहर बसून राहत श्री स्वामी समर्थ दर्शनाची बुवा पराकाष्ठा करीत पण त्यांना श्री स्वामींचे दर्शन मात्र मिळत नसे आज दर्शन घेतल्याशिवाय जायचेच नाही असा निश्चय बुवांनी केला तेव्हा पांघरुणातून श्री स्वामी समर्थांच्या शिव्यांची लाखोली बुवांस ऐकावी लागे असेही बरेच दिवस गेले श्री स्वामी महाराजांचे प्रेम मजवर इतके असून ते असे एकाएकी कसे नाहीसे झाले याचे कारण काय आपण अपराध तरी कोणता केला असावा बुवा बुचकाळ्यात पडले श्री स्वामींची अशी कृती त्यांच्या काही लक्षात येईना एके दिवशी बुवा खासबागेत शेणाचे गोळे घालण्याकरिता गेले श्री स्वामी समर्थांची स्वारीही तेथेच होती बुवा दर्शनास गेले तर श्री स्वामी महाराज नित्याप्रमाणे निजलेले गोळे घालून येऊ आणि मग दर्शन घेऊ असा विचार करुन गोळे घालावयास बुवा गेले बुवाच्या मनात महाराजांनी दर्शन न दिल्याचे काहूर डोक्यात होते अपराध कोणता त्यास काही कळेना कारण कोणते श्री स्वामी महाराजांजवळ पेढे मागितले हेच कारण असावे मोक्ष आदी मागण्या ऐवजी शूद्र पेढ्यांची वासना धरावी किती मी अधम अशी पश्चात्तापाची भावना बुवांच्या मनात निर्माण झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी दर्शनही देत नाहीत आणि बोलतही नाहीत जेव्हा जेव्हा दर्शनास जावे तेव्हा तेव्हा ते डोक्यावर पांघरूण घेऊन पडून राहतात श्री स्वामींचे बोलणे नाही की दर्शन नाही हा काय प्रकार आहे आपल्या हातून असा कोणता अपराध घडला आहे की श्री स्वामींनी आपल्यावर इतके रुष्ट व्हावे बुवा बेचैन झाले काय चूक झाली याचा विचार करु लागले पुष्कळ विचारांती बुवांच्या लक्षात आले आपण पेढ्यासारख्या क्षुल्लक पदार्थाचा प्रसाद मागण्याची चूक केली त्यामुळे श्री स्वामी आपल्यावर रुष्ट झाले असावेत जे दैवत मोक्ष देण्यासाठी समर्थ आहे त्यांच्याकडून एका शूद्र पेढ्याची अपेक्षा आपण केली या अधमपणाची आता बुवांस लाज वाटू लागली यातून काय बोध घ्यावयाचा हे आता विस्ताराने सांगण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थांसारख्या कल्पवृक्षाखाली बसून ताकाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे सदगुरुंची क्षमता मनाने बुध्दीने जाणावी स्वतःचाच अभ्यास स्वतःच नीट करावा आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण सतत करीत राहावे दररोज आम्हा युध्दाचा प्रसंग या संत तुकारामांच्या उक्तीनुसार जागरुक वर्तन ठेवावे हाच यातला बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या