चोळाप्पाची कन्या राजूबाईचा विवाह अनंत भट यांचेशी झाला पुढे तिला क्षयरोग झाला तेव्हा चोळाप्पा श्री स्वामींची प्रार्थना करुन त्यांना सांगू लागला महाराज राजूबाई क्षयरोगाने फार बेजार झाली आहे काय करावे तेव्हा श्री स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या शेणाच्या गोवर्या चोळाप्पास दिल्या श्री स्वामींनी राजूबाईबाबत दुश्चिन्ह सुचविले पुढे पंधरा दिवसांनी राजूबाईचा अंत झाला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

चोळाप्पा श्री स्वामींचा निस्सीम भक्त होते त्याची पत्नी येसूबाई हे दोघेही स्वामींच्या सान्निध्यात असूनही प्रापंचिक जीव असल्यामुळे मोह माया आसक्तीत गुंतलेले होते श्री स्वामींसारख्या परब्रम्हास मानवी जीवनाचे षडरिपूलिप्त सर्व खेळ विदीत होते राजूबाई मृत्यू होणार हे त्यांनी स्पष्ट न सांगता चोळाप्पाच्या हाती शेणाच्या गोवर्या देऊन सूचित केले श्री स्वामींच्या अनेक लीलांमध्ये अनेकांना चांगल्या वाईट शुभ अशुभ गोष्टी त्यांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या कृती करुन सूचित केल्या आहेत आजही ते अशा स्वरुपाचे संकेत देतात आपणास सजग करतात ते निर्गुण निराकार स्वरुपात अत्र तत्र सर्वत्र व्यापून राहिले आहेत मै गया नही जिंदा है आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनांची ते आजही प्रचिती देतात श्री स्वामी उपासकांस सद्यःस्थितीतही शुभ अशुभ गोष्टींचे निर्देश विविध माध्यमातून मिळत असतात त्यातून अनेकांना सावधानता दिलासाही मिळतो होणाऱ्या शुभ अशुभ घटनांची चाहूल लागते उपासकाची श्री स्वामी समर्थांवरील भक्ती निष्ठापूर्वक असेल तर संकट समस्यातून बचाव निश्चितच होतो निदान त्यांची तीव्रता ताप तरी कमी होतो .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या