काशीक्षेत्रातील बहिरेशास्त्री यांना श्री दत्तप्रभूंच्या उपासनेने पुत्र झाला परंतु त्यास १४ वर्षांचे आयुष्य असल्याचे भाकीत त्यांना ठाऊक होते म्हणून उभयता पती पत्नीस मोठी चिंता वाटू लागली एका सत्पुरुषाला त्यांनी विचारल्यावर त्याने सांगितले जर अवतारी पुरुषाची सेवा कराल तर या संकटातून मुक्त व्हाल यावर शास्त्रीबुवा त्यास विचारले हल्ली असे अवतारी पुरुष कोठे आहेत त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले मी थोड्या दिवसांपूर्वी अक्कलकोटला अवतारी पुरुष पाहिले आहेत तेथे तुम्ही जा त्या सत्पुरुषाच्या सांगण्यानुसार ते दोघेही त्यांच्या पुत्रासह अक्कलकोटला आले त्या तिघांनीही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी चार वर्षे श्री स्वामींची एकनिष्ठपणे सेवा केली दरम्यान तो कालनिर्मित दिवस आला श्री स्वामी महाराज खास बागेत इतर सेवेकर्यांसह बसले होते हे तिघेही श्री स्वामींच्या दर्शनास तेथे आले इतक्यात बहिरेशास्त्रींचा मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करुन तो धाडकन जमिनीवर पडला श्री स्वामींनी शास्त्रीबुवास जेव्हा तीळ आणण्यास सांगितले तेव्हा मुलाबाबतचे भाकीत उमजून शास्त्रीबुवा व त्यांच्या पत्नीने रडून श्री स्वामी चरणास मिठ्या मारल्या आणि म्हणाले महाराज चार वर्षे आम्ही आपली सेवा या पुत्राप्रित्यर्थच केली असून शेवटी जे व्हायचे तेच झाले दयाघन श्री स्वामी महाराज त्या उभयताना म्हणाले अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला तेव्हा लगेच साखर तीळ मुलाच्या तोंडात घातले त्यासरशी मुलगा खाडकन उठून बसला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या लीलेतील काशीच्या बहिरेशास्त्रींना नवसा सायासाने मुलगा झाला परंतु त्यास १४ वर्षांचेच आयुष्य होते शास्त्रीबुवा व त्यांच्या पत्नीस एका सत्पुरुषाने अक्कलकोटी जाऊन अवतारी पुरुषाची सेवा करण्याचे सुचविले अशी सेवा केल्यासच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे अल्प आयुषीपण टळणार होते सत्पुरुषाच्या सांगण्यानुसार शास्त्रीबुवा त्यांची पत्नी आणि तो अल्पआयुषी मुलगा असे तिघे जण अक्कलकोटी येऊन श्री स्वामींची एकनिष्ठपणे सेवा करु लागले शास्त्रीबुवा विद्वान होते पत्नी व मुलगा असल्यामुळे ते प्रापंचिकही होते नवस सायासाने झालेल्या मुलाला १४ व्या वर्षी मृत्यू येऊ नसक्ती ही आसक्तीच प्रापंचिकास बरे वाईट काहीही करावयास भाग पाडते या लीलेतील विद्वान शास्त्रीबुवा त्यांची पत्नी त्यांचा मुलगा दीर्घायुषी व्हावा १४ व्या वर्षीच येणारा त्याचा मृत्यू टळावा म्हणूनच श्री स्वामी समर्थांची चार वर्षे एकनिष्ठपणे उपासना करतात अजून त्यांचा कोणता अन्य हेतू संभवतो आपल्या सर्वांची उपासना काहीना काही कामनापूर्ती व्हावी यासाठीच असते या लीलेत श्री स्वामींनी बहिरेशास्त्रींना ते सेवा करीत असताना प्रत्यक्ष असा चार वर्षांत एकदाही उपदेश केला नाही त्याला कोरड्या उपदेशाचे डोस पाजले नाहीत हीच श्री स्वामींची खासियत येथे दिसते उपासना करता करता श्री स्वामींनी त्यांची एकप्रकारे तयारी करुन घेतली निर्धारित दिवस येताच मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करुन जमिनीवर धाडकन कोसळला श्री स्वामींनी त्यांना तीळ आणावयास सांगितले शास्त्रीबुवास ते अशुभपणाचे वाटले तेव्हा श्री स्वामींनी अतिशय सूचक उदगार काढले जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला श्री स्वामींच्या तोंडून जा उदगार जेव्हा जेव्हा बाहेर पडला त्याचे स्पष्टीकरण या अगोदर आले आहेच थोडक्यात श्री स्वामींना असेच सूचित करावयाचे आहे की पूर्व जन्मातील संचित प्रारब्धाची भीती बाळगू नका तुम्ही आमच्याजवळ आहात आता भ्यायचे कारण नाही काळाच्या जबड्यातून श्री स्वामींनी शास्त्रीबुवांच्या नवस सायासाने झालेल्या मुलास वाचविले याबद्दल त्या उभयतांस अतिशय कृतकृत्य वाटले काही दिवस ते तिघे श्री स्वामींच्या सेवेत राहून काशीक्षेत्री निघून गेले जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या तारक मंत्रातील या वचनाचा प्रत्यय येथे येतो ही संपूर्ण लीला काळजीपूर्वक मनोभावे वाचल्यास आपणास काय अर्थबोध होतो श्री स्वामी समर्थ हे त्या काळात अक्कलकोटी (जि.सोलापूर) सदेह स्वरुपात वावरणारे प्रत्यक्ष ईश्वरी अवतार होते (२३-९-१८५७ ते ३०-४-१८७८) सद्यःस्थितीतही मैं गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती अनेक निष्ठावान सेवेकर्यांना येते या कथेतील बहिरेशास्त्रींना चार वर्षे सेवा करावी लागली पण फळ मिळालेच उपासनेत तातडी करुन चालत नाही याचाही येथे अर्थबोध होतो.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या