चिंतोपंत आप्पा टोळ एका घोड्यावर दुसऱ्या घोड्यावर श्री स्वामी समर्थ आणि एक चाकर असे सोलापूरहून अक्कलकोटाकडे निघाले सुमारे चार कोस आल्यानंतर एका स्वाराव्दारे कलेक्टरकडून टोळास हूकूम आला की जरुरीचे काम आहे उभ्या उभ्या भेटून जावे तेव्हा चिंतोपंताने बरोबर असलेल्या चाकरास सांगितले आम्ही आता जाऊन परत येतो तोपर्यंत स्वामीस कोठे जाऊ देऊ नये अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत आले समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडेच राहाणार टोळ गेल्याबरोबर श्री स्वामी समर्थ उठून बागेत गेले बागेतून जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन खंडोबाचे ओट्यावर बसले इकडे चिंतोपंत काम आटोपून परत श्री स्वामीस व चाकरास जेथे थांबावयास सांगितले होते तेथे आले पाहतात तो स्वामी महाराज तेथे नाहीत गड्यावर रागावून स्वामीस कसे जाऊ दिले म्हणून पुसू लागले गड्याने श्री स्वामीस हात जोडून जाऊ नये म्हणून सांगण्याची पराकाष्ठा केली पण महाराजांनी काही ऐकले नाही हम किसके ताबेदार है असे बोलून महाराज दहा पाच पावले गेले मग गुप्त झाले असे गड्याने चिंतोपंतास सांगितले 


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

चिंतोपंत आप्पा टोळ श्री स्वामी समर्थांस घेऊन अक्कलकोटला निघाले होते पण चार कोसावर ते पोहचताच त्यांना कलेक्टरचा सोलापूरला येण्याचा तातडीचा निरोप आल्यावर त्यास माघारी जावे लागले श्री स्वामी समर्थांस चाकराच्या स्वाधीन करुन ते सोलापूरला माघारी यावयास निघाले येथेच चिंतोपंत टोळाचे श्री स्वामी समर्थांच्या स्वरूप सामर्थ्याविषयीचे आकलन तोकडे पडले वास्तविक त्यांना श्री स्वामींच्या दिव्यत्वाची अंतःसाक्षित्वाची कल्पना सोलापूरच्या मंदिरात आली होती असे असताना कलेक्टरचा हूकुम श्रेष्ठ की श्री स्वामी समर्थ श्रेष्ठ याचा निवाडा निर्णय टोळास घेता आला नाही श्री स्वामी समर्थांसारखी दिव्य अवतारी विभूती बरोबर असताना कलेक्टरच्या हुकूमाखातर श्री स्वामींना गड्याच्या स्वाधीन करुन सोलापूरास जाणे टोळाची श्री स्वामींवरील निष्ठा पक्की नव्हती हेच दर्शविते टोळ सोलापूरला परत गेले नसते तर फार तर कलेक्टरचा रोष ओढवला असता नोकरीवर पाणी सोडावे लागले असते पण निष्ठेची कसोटी लागली असती श्री स्वामींनी चिंतोपंतास निश्चितच वार्यावर सोडले नसते देव नुसती श्रध्दा पाहात नाही तर तो निष्ठाही पाहात असतो पण चिंतोपंत टोळ सरकारी नोकरीमुळे परतंत्र होते श्री स्वामींस बसावयास घोडा आणि दिमतीला चाकर दिला म्हणून श्री स्वामी काही कुणाच्या ताब्यात राहाणारे नव्हते नोकरीमुळे आलेल्या मिःधेपणाने टोळांचा मानसिक ताबा घेतला होता पण श्री स्वामींसारखे परब्रम्ह साथीला असताना भीती ती कसली कोणाची आणि का बाळगायची हेच नेमके टोळास उमगले नाही इंग्रज कलेक्टरची ताबेदारी महत्त्वाची मानून ते सोलापूरला गेले पण श्री स्वामी समर्थ ना कोणाच्या अधीन ना कोणी त्यांचा ताबेदार म्हणूनच इंग्रजांचा नोकर असलेल्या टोळाच्या चाकराने श्री स्वामींना पुन्हा पुन्हा विनवणी केल्यावर त्यांनी ते ऐकले तर नाहीच उलट त्याला सुनावले हम किसके ताबेदार नही आपण सत्ता संपत्ती इ.नी कितीही मोठे झालो तरी कुणाचे मिंधे ताबेदार परतंत्र असतो पण ईश्वराचे तसे नसते खर्या खुर्या भक्ताचा तो वेगळ्या अर्थाने दास असतो तो स्व तंत्र स्व नियंत्रित असतो तो सर्वांचा मालक चालक पालक असतो हेच या लीलेतून बोधित होते 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या