चिपळूणला गोपाळबुवा केळकरांच्या मठात एक सिद्ध पुरुष आले बुवांनी त्या सिद्ध पुरुषास विचारले महाराज आपण कुठले आलात कोठून त्यावर तो सिद्ध पुरुष उत्तरला मला काय ठाऊक असे म्हणत तो चालता झाला सिद्ध पुरुष असेच असतात असे गोपाळबुवाला वाटले सिद्ध पुरुषाची बाह्य क्रिया बुवास समजली पण सिद्ध पुरूष अंतरी कसे असतात हे गोपाळबुवास कुठे समजले होते स्वतः गोपाळरांवाना ते स्वतः बुवा महाराज झाल्याचा भ्रम चढला होता लोक बुवांच्या पाया पडत होते बुवा महाराज झाल्याचा दंभ त्यांच्यात निर्माण झाला होता आपणही त्या सिद्ध पुरुषासारखे मला काय ठाऊक असे बोलावे आसे बुवास वाटू लागले बुवा एकदा अक्कलकोटास जात असता एका खेडुताने बुवास सहज प्रश्न केला की बुवा तुम्ही कुठले मला काय ठाऊक असे उत्तर देत गोपाळबुवा श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटी आले बुवांनी श्री स्वामी चरणावर डोके ठेवले तोच श्री स्वामींचा प्रश्न तुम्ही कोठले चिपळूणचे बुवा अहो बुवा चिपळूण कोठे आहे श्री स्वामी महाराज कोकणात बुवा कोकण कोठे आहे श्री स्वामी समर्थ महाराज घाटाखाली बुवा घाट कोठे आहे श्री स्वामी समर्थांशी झालेल्या प्रश्नोत्तरांनी बुवा पुरते शुध्दीवर आले खेडेगावातील त्या खेडुतास दिलेले उत्तर बुवांना आठवले बुवा मनोमन चरकलेच महाराज मला कोकण ठाऊक नाही बुवांच्या या उत्तरावर दयाघन श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने पोट धरुन हसू लागले बुवा मनातल्या मनात लज्जित झाले एका बाजूला जाऊन त्यांनी दोन्ही कान उपटून घेतले आणि श्री स्वामी समर्थांजवळ क्षमा मागितली .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील गोपाळबुवा केळकरांची पारमार्थिक तयारी चिपळूणला येईपर्यंत अपुरीच असल्याचे दिसते लोक त्यांच्या पाया पडत होते त्यांना मानसन्मान देत होते बुवा महाराज म्हणून म्हणत होते गोपाळबुवांनाही आपण सिद्ध पुरुष असल्याचा दंभ निर्माण झाला होता अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होणारे असे अनेक दंभी पूर्वीही होते सद्यःस्थितीत तर त्यांचे पीक उदंड झाल्याचे आपण दूरदर्शनवर पाहतो वर्तमानपत्रात वाचतो अवती भवती तीर्थक्षेत्री मठ मंदिरे संतसंगात अनुभवतो त्यातूनच त्यांनी अक्कलकोटास जाताना खेडुतास दिलेले उत्तर पुढे श्री स्वामी समर्थ आणि बुवांमध्ये झालेली प्रश्नोत्तरे बुवांच्या मनावर सिद्ध पुरुषाचे गारुड उतरविण्यास कशी कारणीभूत ठरली त्याचा वृत्तांत या लीलाकथेत आहे ते आपणा सर्वांना बोधप्रद व मार्गदर्शक आहे श्री स्वामी समर्थ बखरकर्ते श्री स्वामी समर्थ कृपांकित आणि वलयांकित असलेल्या श्री गोपाळ रामचंद्र केळकरांची ही अवस्था मग आपल्यासारख्याची काय अवस्था असेल आपण सर्वसामान्य माणसे आपले तर पूर्ण आयुष्यच भ्रमग्रस्त आणि कमी अधिक अहंभावलिप्त असते मी माझे या परिघात घुटमळणारे असते मी यँव केलं मी तँव केलं हे माझं ते माझं दुसऱ्याचं तेही माझंच मी काही साधा सुधा नाही मला काय समजता तुम्ही .....असे एक ना अनेक अहंभावाचे बुडबुडे मनात निर्माण होत असतात आपल्यातील काही थोड्यांनी अहंकाराचा त्याग केला असतो घर प्रपंच व्यवहारात राहूनही तो आनंदात असतो त्याबाबत ते उदासीन असता उपभोगशून्य श्री स्वामींसारखे ते वावरतात आपण त्यांच्यासारखे व्हायचे आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या