अक्कलकोटहून काही मंडळी कार्तिक स्वामींच्या दर्शनास निघाली त्यात रामशास्त्री सेवेकरी यांच्याही मनात जाण्याचे आले मग ते श्री स्वामी समर्थांकडे जाण्यासाठी आज्ञा मागण्यास गेले त्यावर श्री स्वामी म्हणाले जाऊ नकोस रामशास्त्र्यास वाईट वाटले बाबा सबनीसांनी श्री स्वामींची आज्ञाभंग करुन जाऊ नये म्हणून रामशास्त्रीस सांगितले म्हणून ते गेले नाहीत परंतु त्यांच्या मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ मात्र लागून राहिली पुढे कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी रामशास्त्री स्नानसंध्या करुन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले त्यावेळी पुष्कळ मंडळी श्री स्वामींच्या दर्शनाकरिता तेथे बसली होती श्री स्वामींची मंगलारती झाल्यावर श्री स्वामी महाराज उभे राहिले कार्तिक स्वामींच्या रुपाने रामशास्त्रीस दर्शन दिले कार्तिक स्वामींचे दर्शन होताच रामशास्त्री श्री स्वामी महाराजांची स्तुती करु लागले हे दत्तमूर्ती भगवान आपण प्रत्यक्ष चालते बोलते सगुण निर्गुण ईश्वर आहात परंतु आम्ही अज्ञानी मदांध असल्याकारणाने आपल्या स्वरुपास जाणत नाही तथापि आपल्या साहजिक दयारुप औदार्य स्वभावानेच आमचे इहपर हित होत आहे पदरात प्रचितीचे भरपूर माप पडल्यावर आमचे डोळे उघडतात आणि खात्री होते .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

श्री स्वामी समर्थांचे परब्रम्हस्वरुप सामर्थ्यांची रामशास्त्रीस पुरेपूर कल्पना नसल्यामुळेच कार्तिक स्वामींच्या दर्शनास जाण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली परंतु निकटचा सहवास असलेल्या बाबा सबनीसास श्री स्वामींच्या सामर्थ्यांची त्यांच्या पूर्ण ब्रम्हत्वाची चांगलीच कल्पना होती (माणिक प्रभूंनी त्यांना ती अगोदरच करुन दिली होती ती त्यांनी अनुभवली होती ) म्हणून श्री स्वामी आज्ञेशिवाय जाऊ नये असे सांगितले रामशास्त्र्यांचे भाग्य थोर की त्यांनी बाबा सबनीसांचे ऐकले भगवंताची सर्व स्वरुपे आणि तीर्थे सदगुरुंच्या पायाच्या अंगठ्यात असतात श्री स्वामींनी ब्रम्हनिष्ठ होशील असा आशीर्वाद दिलेले श्री गुरुलीलामृत रचियेते वामनबुवा वाम्बोरीकर म्हणतात गुरु हेचि परम तीर्थोदक अवघी इतर तीर्थे निरर्थक संपूर्ण तीर्थाचे तीर्थोदक गुरुचरणी अखंड तिष्ठतसे यावरुन सदगुरुचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते त्यामुळेच सदगुरुंच्या अनुमतीनेच अन्य देवदेवतांचे दर्शन घेणे इष्ट असते आता श्री स्वामी सदेह आपल्यात नाहीत परंतु निर्गुण स्वरुपात त्यांचे अस्तित्व आहेच म्हणून त्यांचे स्मरण करुन मनोमन आज्ञा मागून अन्य देव देवतांचे दर्शन घेणे इष्ट ते घेतानासुध्दा त्यात श्री स्वामी समर्थ आहेत असे समजून दर्शन घेणे केव्हाही योग्य व श्री स्वामी समर्थ अनुयायास सेवेकर्यास भूषणास्पद सदगुरुंच्या सेवेतच सर्व श्रेय सामावलेले आहे तेच परब्रम्ह असतात याचा प्रत्यक्ष अनुभव रामशास्त्र्यास आणून द्यायच्या हेतूनेच कार्तिक स्वामींच्या दर्शनास जाऊ नको असे श्री स्वामी समर्थांनी त्यास सांगितले परंतु तरीही रामशास्त्रींच्या मनात कार्तिक स्वामी दर्शनाची रुखरुख राहून गेली होती एकदा सदगुरुविषयी निष्ठा म्हटल्यानंतर कोणतीही खंत अथवा रुखरुख अगर किन्तु परंतु मनात राहता कामा नये हा बोधही या लीलेतून मिळतो श्री स्वामींनी कार्तिक स्वामींच्या स्वरुपात रामशास्त्र्यास दर्शन देऊन त्याच्या मनातील रुखरुखही घालविली यावरुन आपण सर्वांनीच काय बोध घ्यायचा हे येथे विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या