एके दिवशी बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी सरदार मानकर्यांसमोर दरबारात असा विचार मांडला की जो कोणी श्री स्वामी समर्थांस बडोद्याला घेऊन येईल त्यास आम्ही मोठी जहागिरी देऊ व महाराजांस आणण्याप्रित्यर्थ पाहिजे तितके द्रव्य खर्च करु हे ऐकून तात्यासाहेब हर्षे सरदाराने मी आणतो असे म्हणून पैजेचा विडा उचलला पुष्कळ द्रव्य देऊन लव्याजम्यानिशी तात्यास अक्कलकोटास रवाना केले तात्यासाहेब अक्कलकोटला आल्यावर अक्कलकोटात त्यांनी श्री स्वामी समर्थांसन्निध असलेल्या सेवेकरी मंडळीस अन्नवस्त्रादी देऊन खूष ठेवण्याचा क्रम चालू ठेवला आणि श्री स्वामी महाराजास कोणानाकोणा मार्फत बडोद्यास जाण्याबद्दल रदबदली करण्याचाही क्रम चालू ठेवला सहस्त्रभोजन द्याल म्हणजे येऊ ब्राम्हणाला द्रव्य दे गोरगरिबास वस्त्र दे असे रोज काही ना काही करावयास लावून श्री स्वामी समर्थ वेळ मारुन नेत तात्यासाहेबही त्याप्रमाणे पुष्कळ खर्च करीत चार महिन्यांपर्यंत तात्या श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होता चोळाप्पा श्री स्वामी समर्थांच्या मर्जीतले आहेत असे हेरुन श्री स्वामी महाराजांस बडोद्यास घेऊन चलाल तर तुम्हाला दहा हजाराची जहागिरी मल्हाररावाकडून करुन देवविन असे चोळाप्पास सांगितले हे ऐकून चोळाप्पाच्या तोंडास पाणी सुटले एके दिवशी चोळाप्पा श्री स्वामी महाराजांपुढे जाऊन हात जोडून म्हणाला महाराज आपण बडोद्यास चलाल तर मला दहा हजाराची जहागिरी मिळत आहे हे ऐकून श्री स्वामी महाराज हसत हसत म्हणाले अरे त्याजपाशी भक्ती नाही.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेच्या भागावरुन मानवी स्वभावाच्या आचार विचार धर्माची दृष्टिकोनाचे कसे विविध पदर असतात याची सहज कल्पना येते श्रीमंत मल्हारराव गायकवाडास राजसत्तेची आणि वैभवाची इतकी घमेंड होती की श्री स्वामी समर्थांसारखे परब्रह्य दैवत आपण सत्ता संपत्तीच्या जोरावर सहज बडोद्यास आणू पैजेचा विडा उचलणारे सरदार तात्यासाहेब हर्षे यांनीही सारासार विचार खुंटीला टांगून श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा पैजेचा विडा उचलला आपण कोणाच्या संदर्भात हा विडा उचलतो याचे भान आणि ज्ञान  त्यांना त्या बडोद्याच्या वैभवशाली दरबारात आणि सत्ता संपत्तीच्या उन्मादात राहिले नाही बडोद्याच्या दरबारातल्या या सर्व घडामोडी श्री स्वामींना त्यांच्या अंतःसाक्षित्वाने इकडे अक्कलकोटात कळत होत्या जेव्हा सरदार तात्यासाहेब हर्षे यांनी मी आणतो म्हणून पैजेचा विडा दरबारात उचलला तेव्हा श्री स्वामी समर्थ खदा खदा पोट धरुन हसू लागले तात्या पैज लावतो हावरा लुच्चा जहागिरी हवी त्याला असे बोलू लागले कुणासही श्री स्वामींचे हे बोलणे कळेना श्री स्वामी आज असे काय बोलताहेत ते कोण तात्या कसली पैज परंतु थोड्याच दिवसात सरदार द्रव्य आणि लवाजम्यासह बडोद्याहून अक्कलकोटास आले श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले यावरुन तात्यांच्या अविवेकीपणाचा श्री स्वामींमधील देवत्व न जाणण्याचा कोतेपणाच दिसून येतो या लीलेत तात्या जरी सरदार असले तरी सर्वसामान्य जीवच आहेत निखळ भक्ती निर्लोभीपण आणि निरामयता त्यांच्यात नव्हती परमेश्वर प्राप्तीपेक्षाही पैज जिंकणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते चोळाप्पा प्रत्यक्ष श्री स्वामींच्या सहवासात राहूनही कच्च्या शिष्या सारखा वागला लोभीपणात गुरफटलेल्या चोळाप्पाला श्री स्वामींनी स्पष्टपणे नकार देत म्हटले अरे त्याजपाशी भक्ती नाही या लीलाभागातून निखळ निर्लेप एकनिष्ठ भक्तीपेक्षा काहीच श्रेष्ठ नाही याचा सुस्पष्ट बोध होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या