अक्कलकोटपासून आठ योजने (कोस) दूर सिध्दनकेरी नावाचे एक गाव आहे तेथे जंगम जातीचे गुरू सिध्दाप्पा म्हणून मठाधीश होते त्यांचे उत्पन्नही मोठे होते त्यांच्याजवळ त्याकाळी हत्ती घोडे गाई म्हशी आदी जनावरेही पुष्कळ होती ते वृत्तीने सात्त्विक आणि भाविक होते श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनासाठी ते शिष्यवर्गासह अक्कलकोटी आले श्री स्वामींचे दिव्य तेज पाहताच सिध्दाप्पाने साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले महाराज आज माझे मनोरथ पूर्ण झाले आपल्या दर्शनाने कृतकृत्य झालो आता ही महंती (मठाधीशपणा) काय चुलीत घालायची आहे महाराज आता या चरणाशिवाय काही नको असे मनोगत व्यक्त करुन सिध्दाप्पा श्री स्वामींसमोर उभे राहिले संध्याकाळपर्यंत सिध्दाप्पासह त्यांच्या शिष्यांना उपवास पडला तेव्हा श्री स्वामी सिध्दाप्पास म्हणाले आरे तुला एक भाकर देतो ती तुला पचेल काय त्यावर सिध्दाप्पा उत्तरला महाराज आपण कृपा करुन जे द्याल ते मलाच पचेल असे नाही तर पाहिजे त्यास पचेल समोर असलेल्या धनगरास हाक मारीत श्री स्वामी म्हणाले आरे धनगरा तुझ्याजवळ असलेली भाकर इकडे आण श्री स्वामींनी ती भाकर सिध्दाप्पास दिली वास्तविक शिवभक्त असलेले जंगम जंगमाशिवाय इतर कोणाकडेही अन्नोदक घेत नाहीत असे असूनही सिध्दाप्पाने ती प्रासादिक भाकर भक्षण केली त्याच चमत्कार असा झाला की सिध्दाप्पाचा मठ महंतीचा ताठा सुटला देहअहंता गळित झाली ब्रम्हास्वरुपी एकत्व वृत्ती रंगली सिध्दाप्पास कोणतेही भान राहिले नाही श्री स्वामींनी त्यास जवळ बोलावून सांगितले की तुम्ही आपल्या संस्थानी जाऊन अभिन्नत्वाने ब्रम्हास्थिती भोगावी स्वतः निःस्पृह निर्लोभपणे वागून सर्व लोकांस प्रिय मधुर भाषणाने संतोष देत जा श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन सिध्दाप्पा सिध्दनकेरी आले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
सिध्दनकेरीचा सिध्दाप्पा जंगम समाजाचा मठाधिपती होता तो चांगलाच समृद्ध होता श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा त्याच्यावर परिणाम झाला त्याचे मनोरथ पूर्ण झाले श्री स्वामींच्या दर्शनाने त्यास कृतकृत्य झाल्याचे जाणवले श्री स्वामीदर्शनापुढे मठाच्या महंतीचीही त्यास तमा वाटेनाशी झाली श्री स्वामी समर्थांच्या चरणाशिवाय अन्य कोणतेही वैभव त्यास कःपदार्थासारखे वाटू लागले यातून श्री स्वामींच्या दैवी सामर्थ्याचा प्रभाव जंगमाच्या महंतावरसुध्दा कसा आणि किती पडला हे स्पष्ट दिसते शिवभक्त असलेला जंगम समाज त्यांच्या समाजाशिवाय अन्य कुणाचेही अन्नोदक घेत नाही असे असतांनासुध्दा सिध्दाप्पाने श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेचे पालन करुन धनगराकडील भाकर खाल्ली श्री स्वामींच्या हस्तस्पर्शाचा सकारात्मक परिणाम व श्री स्वामींचा त्यास उपदेश वरील लीलेत आलेला आहे श्री स्वामींचे सामर्थ्य देवत्व श्रेष्ठत्व हे वादातीत आहेच परंतु त्यांचा आचार विचार धर्म आणि तत्त्वज्ञानही कोणत्याही काळावेळात आणि कुणासही लागू पडणारे व उपयुक्त आहे श्री स्वामी मंगळवेढ्यात असताना सिध्दाप्पाच्या आईस दिलेल्या आशीर्वादरुपी वरातून सिध्दाप्पाचा जन्म झाला होता पुन्हा त्याच सिध्दाप्पावर श्री स्वामीकृपा झाली हे सर्वच मोठे विलक्षण व विचार करावयास लावणारे आहे श्री स्वामींच्या दर्शनाने सिध्दाप्पाच्या ह्रदयात ज्ञानसागर उसळला त्यांच्या हस्तस्पर्शाने प्राप्त झालेल्या धनगराकडील भाकरीच्या प्रसादाने जात धर्म पंथ आदी भेदाभेद टरफलाप्रमाणे गळून पडले मठ महंतीचा अभिनिवेश नाहीसा झाला असेच आपणा सर्वांनाच श्री स्वामी समर्थांच्या कृपेस पात्र होता येईल .
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या