एका ब्राम्हणास पोटशुळाचा त्रास होता तो नाहीसा व्हावा म्हणून तो नरसोबाची वाडी येथे गुरुचरित्राची पारायणरुपी सेवा बरेच दिवस करीत असता त्यास स्वप्न दृष्टांत झाला ब्रह्या विष्णू महेशरुपाने अक्कलकोटास मी अवतार घेतला आहे तेथे जा म्हणजे या व्याधीपासून मुक्त होशील हे स्वप्नद पुजार्यास सांगितले असता त्याने त्या ब्राम्हणास अक्कलकोटला जाण्याची स्पष्ट आज्ञा झाल्याचे सांगितले ब्राम्हण अशक्त असल्याने त्याने अक्कलकोटला जाण्यासाठी एक घोडे विकत घेतले मी अक्कलकोटला सुखरुप पोचल्यावर सव्वा रुपयांचे पेढे स्वामींपुढे ठेवीन असा नवस केला श्री स्वामी महाराज चोळाप्पाचे घरी आहेत असे कळल्यावर तो बाहेरच्या दरवाजाच्या आत घोड्यासकट जाऊ लागला पण ते घोडे दरवाजातच अडकले त्याने खाली उतरुन घोड्याला आत शिरण्यासाठी खूप मारहाण केली पण व्यर्थ दरवाजातच अडकलेले घोडे आत जाईना किंवा बाहेरही येईना तेथे असलेल्या लोकांनाही आश्चर्य वाटले घरात आतल्याबाजूस पलंगावर बसलेले श्री सदगुरु माउली हसत हसत म्हणाले मादरचोदा सव्वारुपयाचे पेढे भुलून गेलास असे त्यांनी दोन चार वेळा म्हटल्यावर चोळाप्पाने दरवाजात येऊन त्यास सांगितले अहो तुम्हास स्वामी सव्वा रुपयांचे पेढे आणण्यास सांगत आहेत पोटशूळाने त्रस्त झालेल्या त्या ब्राम्हणास त्यानेच बोललेल्या नवसाचे स्मरण झाले त्याने तत्काळ सव्वा रुपयांचे पेढे आणले त्यासरशी घोडे दरवाजातून मागे सरुन दरवाजातून बाहेर आले त्याने नारळ पेढे श्री स्वामी महाराजांपुढे ठेवून दर्शन घेतले तो सर्वांना सांगू लागला मी वाडीस पेढ्यांचा नवस केला पण पुढे विसरलो म्हणून घोडे दरवाजात अडकले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

पोटशूळाचा त्रास निवारणार्थ ब्राम्हणाने नरसोबाची वाडी येथे गुरुचरित्राची पारायणरुपी सेवा केली पण उपयोग झाला नाही पण या सेवेने त्यास स्वप्नदृष्टांत रुपाने मार्गदर्शन मिळाले तो सव्वा रुपयांच्या पेढ्यांचा नवस बोलला दृष्टांतानुसार तो घोड्यावर बसून अक्कलकोटला पोचला पण नवस बोलल्याप्रमाणे सव्वा रुपयाचे पेढे घ्यायचे विसरला परिणामी ज्या घोड्यावर बसून आला होता ते घोडे दरवाजाच्या मध्यभागीच उभे राहिले काही केल्या ते ना पुढे जाई ना मागे जाई अखेरीस नवसाची पूर्ती केल्यावरच ते घोडे तेथून हालले या लीला घटनेवरुन श्री स्वामी हे अंतर्ज्ञानी तर आहेतच पण आपल्या सर्वांचे नियंता आहेत याची साक्ष पटते ते काही पेढ्यांसाठी आसुसलेले नव्हते पण कबुल केल्याप्रमाणे वागावे देवास दिलेले वचन पाळावे मनाचा कद्र्पणा दाखवू नये एवढीच अपेक्षा असते सुसंस्कृतपणा कृतज्ञता याची अपेक्षा परमेश्वराची असते आपली मनोकामना पूर्ण करणाऱ्याची एवढीही अपेक्षा का नसावी वचनपूर्ती कृतज्ञता याचा बोध या लीलेतून होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या